अभाविपच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे जल्लोषात स्वागत
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभाविप जालनाने राबविले विविध कार्यक्रम
अमृतमहोत्सवी वर्षाचे जल्लोषात स्वागत – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न
रावेर प्रतिनिधी:-
१५ ऑगस्ट पासुन भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे
सर्व भारतीयांसाठी ही आनंदाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळच्या वतीने दि.१४ व १५ ऑगस्ट या दोन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोविडची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यक्रम करणे शक्य नव्हते म्हणुन अभाविपच्या वतीने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला. याची सुरुवात म्हणून अभाविपने जिल्हाभरात ५००० कुटुंबांपर्यंत पोहोचून भारत मातेच्या प्रतिमेचे वाटप केले व १५ ऑगस्ट रोजी या प्रतिमेचे पूजन करण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले. यामध्ये भुसावळ जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये संपर्क करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घरी घरी जाऊन ५००० प्रतिमांचे वाटप केले.
दि १४ ऑगस्ट रोजी जामनेर येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले यात एकूण 45 नागरिकांनी रक्तदान दिले, या कार्यक्रमात महंत श्री जनार्थन महाराज व माजी मंत्री गिरीश महाजन तसेच जामनेर मधील नागरिकांनी हजेरी लावली होती.
दि १५ ऑगस्ट रोजी रावेर व जामनेर मधील १५ प्रमुख चौकांमध्ये सामुहिक राष्ट्रगान व भारत माता पुजन केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यामध्ये एकंदरीत १००० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला. १५ ऑगस्ट ला रावेर व मुक्ताईनगर मधील मुख्यचौकात व घरा वरती ४५ ठिकाणी तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. तसेच रावेर तालुक्यता ७५ वृक्षारोपण करून स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमात भुसावळ जिल्ह्यातील १२८ गावात अभाविप तर्फे अमृत महोत्सव साजरा करण्यात आला अशी माहिती अभाविप चे जिल्हा संयोजक अभिजीत लोणारी यांनी दिली
या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.