सावखेडा येथे एकाच केळीच्या झाडाला दोन केळीचे घड

रावेर प्रतिनिधी:-

रावेर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील शेतकरी विजय त्र्यंबक बढे यांनी सह्याद्री फार्म नाशिक येथील टिश्यू कल्चर पाच हजार रोपांची लागवड केलेली आहे. त्यात एका झाडावर निसर्गाचा अद्भुत चमकाल दिसून आला. एका झाडाला तब्बल दोन केळीच्या घडांची निसवण झाली आहे.

एका झाडाला दोन घडांची निसवण ही निसर्गचक्रातील दुर्मिळ गोष्ट असून दोन्ही घड हे अतिशय उत्तम प्रकारे पोसले जात आहे. अशी दुर्मिळ झाडे जर प्रत्यक्षात जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना दुहेरी हंगाम मिळणे नाकारता येत नाही. सदर तंत्रज्ञान जर टिशू कल्चर कंपनी यांनी आत्मसात केले तर शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होऊन शेती क्षेत्रात केळीसाठी अत्यंत चांगले दिवस आल्या शिवाय राहणार नाही असे येथील शेतकरी विजय बडे यांचा मुलगा जय बढे यांनी माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!