शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान शिंगाडी येथे संपन्न..
निंभोरा बु।।– प्रमोद कोंडे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून या शिवसंपर्क अभियानाला नागरीकांचे प्रचंड प्रमाणात समर्थन मिळत आहे. दि.२ ऑगस्ट सोमवार रोजी रावेर तालुक्यातील शिंगाडी येथे शिवसेना जि. प्रमुख तथा मा.आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, तसेच शिवसेना जि.उप प्रमुख प्रल्हादजी महाजन, ता.अध्यक्ष योगिराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान तालुक्यात सुरू असून शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचाव्यात, गावातील विकास काम,तसेच सदस्य संख्या वाढीवर या अभियानात मार्गदर्शन करण्यात आले.या शिवसंपर्क अभियानास उपस्थित मान्यवर , जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील, उपतालुका प्रमूख विनोद पाटील , विजय पाटील ,कांडवेल ग्रा.पं. सदस्य राहुल पाटील, सुलवाडी माजी सरपंच प्रकाश जोगी , संतोष पाटील, वाघाडी येथील सरपंच रामादादा इंगळे युवासेना जि.प .गट प्रमुख भैय्या भाऊ, राहुल जव्हरे, माजी उपसरपंच शिंगाडी विनोद पाटील, सुधीर पाटील, जितेंद्र चर्होटे , सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वामन पाटील,आत्माराम पाटील, अतुल पाटील, स्वप्नील पाटील, दिवाकर चौधरी, गोंदू पाटील, अमोल पाटील ,विशाल चर्हाटे , चेतन पाटील,सुनील बावसकर, दिनेश पाटील ,सूरज पाटील, अनिल चर्हाटे , रवींद्र पाटील, अमृत पाटील,प्रल्हाद पाटील आदि शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.