रावेर सोसायटीत अत्यंत धक्कादायक निकाल पांठीबा देणाऱ्या सौ . जनाबाई गोंडू महाजन एका मताने विजयी..
रावेर शहर प्रतिनीधी –
२२ नोव्हे जिल्हा बॅकेच्या सोसायटी मतदार संघातुन चक्क माजी आमदार अरुण दादा पाटील यांना पाठींबा दिलेल्या सौ . जनाबाई गोंडू महाजन एक मताने विजयी झाल्या त्यांना २६ मते पडले तर अरुण दादा पाटील यांना २५ मते पडले यात तर राजीव रघुनाथ पाटील यांना ० मतदान पडले जिल्हात सर्वात धक्कादायक हा विजय मानला जात असुन आमदार शिरीष दादा चौधरी व राष्ट्रवादीचे जिल्हा नेते नाथाभाऊ खडसे यांची येणाऱ्या विधान सभेच्या भविष्याची खेळी असल्याचे मानले जात आहे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात अरुण दादा यांचे राजकीय भवितव्य कमी करून समाजिक गट तट निर्माण करण्यात यशस्वी तसेच धन शक्ती यांचा विजय असल्याचे दिसत आहे ( विजयी सौ जनाबाई गोंडु महाजन ) यांच्या मुलीचे काल मतदानाच्या दिवशी लग्न होत त्यात ते व्यस्त असतांना सुद्धा विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडते कशी काय ? असा प्रश्न राजकीय जाणकार माडत आहे
______________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !