रावेरच्या सर्व मुस्लीम समुदयाच्या वतीने त्रिपुरा राज्यांत झाल्याचा हिंसाचाराच्या प्रार्श्वभुमीवर तहसिलदारांना दिले निवेदन..

रावेर शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसा पासुन मुस्लीम समाजाच्या मशिदी वर तसेच प्रार्थना स्थळावर काही विशीष्ठ संघटना ह्या हल्ले, जाळपोळ करीत असुन तेथील मुस्लीम समाजाचे नुकसान झाले आहे तरी त्यांना योग्य असा मोबदला देत त्यांना देण्यात यावा तसेच योग्य असे त्यांच सरंक्षण व्हावे तसेच काही दहशती संघटनेच्या वतीने इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत पैगंबर मोहम्मद (स) यांच्या बद्दल अवाच्च शब्द वापरून मुस्लीम समाज बांधवाच्या भावना दुखवण्यात आल्याने आम्ही अश्या लोकाचे तीव्र निषेध करतो तसेच
यासाठी रावेर सर्व मुस्लीम समुदयाच्या वतीने देशाचे राष्ट्रपती श्री . राम कोविंद जी यांना ह्या कडे लक्ष देवुन संबधीत संघटना व त्यांना मदत करणाऱ्या वर योग्य अशी कारवाई करण्यात असे निवेदन रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले निवेदन देण्या प्रसंगी गयास शेख रशीद , युसुफ खान इरफान खान, शे आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद , शे सादीक शे नबी , असद खाँ मेहमुब खॉ , अयुब खाँ भुरे खाँ , शे .कलीम शे कादिर हे मुस्लीम समाजाचे मान्यवर उपस्थीत होते.

___________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!