निवृत्त सेवा संघ त्रेमासिक सभा संम्पन्न ..

रावेर -शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

श्रीमती आशालता लीलाधर राणे (निवृत शिक्षीका ) साई मंदीरा शेजारील निवास स्थानी सर्व सेवा निवृत्त संघाच्या तीन महीन्याने होणारी सभा घेण्यात आली.
सभेचे आयोजन सेवा निवृत्त संघ अध्यक्ष श्री मानकरे गुरुजी दादा व श्रीमती आशालता राणे यांनी केले . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन करण्यात आले
सरचिटणीस श्री सुधाकर चौधरी (निवृत्त शिक्षक )यांनी प्रास्ताविक मध्ये नियमित मिळणारे पेन्शन व्हायला उशीर होतो यावर खंत व्यक्त केली यावर आपण काय करू शकतो विषयाची बैठकीत अध्यक्ष सह अन्य सदस्य समवेत चर्चा झाली.
यात 5 टक्के फरक व 7 वा वेतन चा हप्ता यांविषयी अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले पेन्शन अदालत सुरु करण्याचा ठराव सभे मध्ये मंजूर करण्यात आला दि.16 डिसे रोजी संघांचे अधिवेशन स्वामी विवेकानंद शाळेत घेण्याचे सर्वानु मते ठरविण्यात आले सभेला सर्वच सदस्य उपस्थिती राहील यां करिता सर्वानी प्रयत्न करावे असे मत श्रीमती आशालता राणे यांनी मांडले. साई मंदीर संस्थान चे उपाध्यक्षपदी
राणे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेला पंचायत समिती चे शिक्षण विभागाचे भाऊ साहेब श्री प्रवीण पाटील उपस्थित होते.
राणे परिवार तर्फे उपस्थित सर्व मंडळी चे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. बैठकीत माधव गुरुजी,नीलकंठ किरणगे, जनार्दन भारंबे हरी पाटील,रमजान तडवी, हशमातली जनाब, परदेशी दादा यांच्या सह अन्य जेष्ठ उपस्थित होते.

_____________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!