केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांचा अभिनव उपक्रम खदान कामगार कुटुंबांना पौष्टिक शिधा व सुकामेवा वाटप…

रावेर प्रतिनीधी- [ईश्वर महाजन ]

केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव यांच्यातर्फे रावेर शहरातील दत्तछाया स्टोन क्रशर परिसरातील गरीब खदानीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील महिला यांना पौष्टिक शिधा व सुका मेवा चे वाटप करण्यात आले.
स्तनपान करणाऱ्या माता व गरोदर महिलांसाठी उपयुक्त असा पोषक आहार नित्य उपलब्ध नसतो, त्यामुळेच बऱ्याच अश्या अतिदुर्गमभागात कुपोषीत बालकाचे प्रमाण वाढत म्हणूनच अशा महिलांसाठी केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव एक अभिनव उपक्रम राबवत असते गरजवंतांना हे किट वाटप करण्यात आले. या प्रंसगी केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव संचलित चाईल्ड हेल्प लाईन च्या समुपदेशक सौ वृषाली जोशी, सदस्य कु. संजीवनी सावळे व प्रसन्न बागल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ नयना निलेश पाटील [ प्राध्यापिका ] विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान देवगिरी प्रांतच्या शिशुवाटिका विभाग प्रमुख व यशवंत प्रतिष्ठान,रावेर संचलित किलबिल अकॅडमी ,रावेर ,पूर्व प्राथमिक शाळेच्या प्राचार्या यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात महिला सशक्तिकरण व सबलीकरणाची आवश्यकता अजूनही खूप आहे. अनेक जण मुख्य प्रवाहापासून फारच लांब आहे. त्यासाठी आपण सर्व मिळून कार्य करण्याची, वेळ देण्याची आवश्यकता असुन आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते ,अर्थार्जनात सहभाग नोंदवते म्हणूनच पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही पोषक आहार मिळणे तेवढेच आवश्यक असते असे अनेकविध विषय मांडले. उपस्थित महिलांना वैद्यकीय विषयांबाबत माहिती देत असताना सकस पौष्टिक आहाराची गरज व आरोग्याची काळजी या विषयावर सौ वृषाली जोशी यांनी मार्गदर्शन केले. भविष्यात या विषयाची नैतिक जबाबदारी सांभाळून विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन आपण करण्याचे मानस घेवुया .कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शितल चंद्रकांत राऊत राष्ट्रसेविका समिती ,भुसावळ जिल्हा या होत्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ रेखा राजेंद्र चौधरी मा. पंचायत समिती सदस्या यांनी आपल्या मनोगतात आगामी काळातही रावेर परिसरात शैक्षणिक ,सामाजिक , वैद्यकीय व विशेष करून महिला विषयात कार्य करण्याचा मानस व्यक्त केला . कार्यात सक्रियता व यथाशक्ति मदतीची ग्वाही दिली. सौ उज्वला संजय सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.

———————————————————————————————————————————–

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!