शिवसेना रावेर च्या वतीने वीज अभियंत्यास दिले निवेदन
रावेर शहर प्रतिनिधी:-(ईश्वर महाजन)
रावेर शिवसेना तालुकाप्रमुख श्री योगीराज पाटील यांच्या नेतृत्वात रावेर तालुक्यातील शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता पाटील यांना निवेदन दिले.
सध्या मागील महीन्यात वारा व पाऊस यामुळे शेतकरी यांचे येणारे हाताशी येणारे पीक कपाशी ,मका ,ज्वारी ,सोयाबीन , उडीद मुग व केळी भाजीपाला पाण्यामुळे सडले असे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा अत्यंत .भीषण परिस्थिती असून शेतकरी यांना वेळेवर लावलेला खर्चही निघणे मुश्कील असल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आली आहे त्यात महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी धडक मोहीम राबवत शेती वीज पंप बिले न भरल्यास वीज तोडणी सुरू आहे किंवा रोहित्र जळाल्यास आधी बिल भरा नंतर नवीन रोहीत्र लावु असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांना .वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना असल्यामुळे त्यांना कारवाई करणे गरजेचे आहे व ते करीत आहे त्या अनुषंगाने शिवसेना रावेर तालुका च्या वतीने कार्यकारी अभियंता साहेब रावेर यांना निवेदन देण्यात आले आज संध्याकाळ पर्यंत वीज तोडणी बंद न झाल्यास 29 तारखेला उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक सुरेश शिंदे शिवसेना पदाधिकारी नितीन महाजन रावेर शहर प्रमुख प्रवीण पंडित ,युवा सेना तालुका अध्यक्ष वसीम खान , राकेश घोरपडे , संतोष महाजन , राम शिंदे ,कुणाल बागरे ,देवेंद्र बागरे,समाधान महाजन ,निलेश महाजन मुकेश पाटील बरेच शिवसैनिक उपस्थीत होते
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832