रावेर पुरवठा विभाग रेशन धान्य दुकानदार व धान्य लाभार्थी यांचे सगमनाने होताते हे कारनामे
रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन )
२३ आक्टों रोजी सध्या रावेर तालुक्यात व शहरात सध्या महाराष्ट राज्य अन्न पुरवठा विभाग मार्फेत प्रती व्यक्ती गहू ३ किलो व तांदुळ प्रती व्यक्ती २ किलो दे ण्यात येतो तर केंद्रातर्फे मोफत गहू तांदूळ देण्यात येतो पंरतु ज्यांना खरच गहु – तांदुळ ह्याचांच पुरवठा होत असतो येणारी साखर फक्त शासनाच्या गोडावुन मध्ये उतरण्यात येते कागदपत्रांची पुर्तता होवुन ही साखर गहू, तांदुळ हा वि वस्थीत रित्या विल्हेवाट करण्यात येते यात पुरवठा विभाग काही अधिकारी , रेशन धान्य दुकानदार यांचा नियोजनबद्ध . हस्तक्षेप असतो तर अत्यंत .गरज असणारे धान्य गहु तांदुळ व इतर वस्तु ह्या लाभार्थी यांना मिळत नसुन चुकीच्या पद्धतीने शासनाच्या व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वरदहस्त वापरुन सर्व्हेक्षण करणारे पुरवठा विभागाचे कर्मचारी संगमताने मिळणारा गहू तांदुळ हा परस्पर रावेर परिसरातुन प्रत्येक तडवी कॉलनी , विदया कॉलनी , जिजाऊ नगर, सौभाग्य नगर, इमामवाडा’ मण्यार वाडा , बंडू चौक थंडा परिसर, राजे , अष्टविनायक नगर, शिवाजी चौक , मरी माता मंदीर जवळपास सर्व गावातुन १० ते १५ माल वाहू रिक्षा गहु , तांदुळ धान्य बिनधास्तपणे आठ ते दहा रुपये भावाने खरेदी करून हाच खरेदी केलेला रेशनचा गहू तांदळ हा पुढे मार्केट मध्ये २० ते २५ रुपये भावाने दिला जातो किंवा आडत दुकानदारास शेतकर्यांचे माल म्हणून विकला जातो . सदरहून ह्या खरेदी विक्रीच्या रॅकेट मध्ये जवळपास सर्व विभागीय यांचे हात असतात त्यात पुरवठा विभाग, स्वस्त धान्य दुकानदार , शेशन घेणारे लाभार्थी पोलीस प्रशासनाचे पण हातभार असतो प्रत्येक विभागातीत यात गुंतलेला आहे त्यामुळेच येथुन हे गाडीवाले धान्य जमा करून सर्रास घेवुन जाताना दिसत असुन एक गाडी वाल्या स सामान्य व्यक्ती .म्हणुन चर्चा केल्यावर कळले की प्रत्येक ठिकाणी हप्ता ठरलेला आहे त्यामुळेच आम्ही बिनधास्तपणे हे धान्य आम्ही खरेदी करतो
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832