म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येणारे ग्रामसाधन तरुणांनी दिले गट विकास अधिकारी व तहसिलदार यांना दिले निवेदन
रावेर शहर प्रतिनिधी (ईश्वर महाजन )-
दि.22 रोजी दुपारी 12 च्या दरम्यान रावेर तालुक्यातील ग्राम साधन व्यक्ती यांनी रावेर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल मॅडम व रावेर तहसिलदार प्रतिनिधी रावसाहेब चंदुलाल पवार यांना निवेदन दिले
सविस्तर वृत असे
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सामाजिक अंकेशन संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई कडून (social Audit ) यासाठी सन 2019 साली रावेर येथे नवीन पंचायत समीती हॉल मध्ये दिनांक .23 – 08 – 2019 ते 23-9 – 2019 ह्या एक महीन्याच्या कालावधीत सामाजिक अंकेशन करण्यात आले.त्यासाठी रीतसर अर्ज प्रक्रिया राबवून मुलाखती द्वारे त्यांची ग्रामसाधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली. व नियुक्ती झालेल्या व्यक्तींना पंचायत समिती कार्यालय रावेर येथे प्रशिक्षण देण्यात आले.
त्यानंतर सामाजिक अंकेशन ( social Audit) करून शासनाच्या नियोजनानुसार संपूर्ण कार्यक्रम राबविला होता. त्याबद्दल ग्रामसाधन व्यक्तींना मानधनही देण्यात आले होते. जेणे करु म.गांधी रा. रोहयो. अंतर्गत कामे व सुस्पष्ट तसेच शासनाचे प्रतिनीधी म्हणुन काम साभाळेल व शासन व ग्राम पंचायत यांच्यातील कामे पारदर्शक होण्यास मदत होईल तसेच भष्टाचारास आळा बसेल यासाठी यांची नियुक्ती व प्रशिक्षण घेतल होते परंतु राज्यात सरकार बदलले व ह्या व्यक्ती साधन यांच्या नियुक्त्या पण एक प्रकारे स्थगिती मिळाली पंरतु सामाजिक अंकेशन संचनालय मुंबई यांनी ही प्रक्रिया चालू न ठेवता बंद करण्यात आली याचे नाहक बळी हे
सर्व ग्रामसाधन व्यक्ती ठरले हे प्रशिक्षित असून सुद्धा त्यांना डावलण्यात येत आहे आगामी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो च्या सामाजिक अंकेशणासाठी ( social Audit) पुनर्नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून आम्हाला रोजगार ही उपलब्ध होईल.आणि सामाजिक अंकेशन ( social Audit ) करण्यातून पारदर्शकता येईल. याकरिता दरवर्षी Audit होणे गरजेचे आहे.आणि मुळातचं आधीच आम्ही प्रशिक्षित असून आपल्याला परत प्रशिक्षण देण्याची अथवा घेण्याची गरज भासणार नाही.तरी यातून शासनाचा वेळ आणि पैसा या दोघांचीही बचत होईल. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आम्हाला सामाजिक अंकेशणासाठी पुनर्नियुक्ती करण्याची मागणी ग्रामसाधन व्यक्तींनी मा.तहसीलदार, रावेर गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडे निवेदनद्वारे केली. त्याचबरोबर मा.मुख्यमंत्री, रोहयो राज्य मंत्री, प्रधान सचिव रोहयो मुंबई,यांनाही ईमेल द्वारे निवेदन सादर करून मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामसाधन व्यक्तींनी आमच्या दै. महाराष्ट्र सारथी.शहर प्रतिनिधी शी बोलतांना माहीती दिली.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832