ईद – ए मिलादच्या प्रार्श्वभुमीवर हिन्दुं मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन….

रावेर – शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

ईद – ए मिलादच्या पार्श्वभूमीवर रावेर येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने मुस्लिम समाजातील मौलाना , पंच मंडळ आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करून सर्व मान्यवर त्यांच्यावर पुष्पवृष्टी ही केली . गणेशोत्सवात सुरू झालेल्या हिंदू – मुस्लिम ऐक्याच् एक पाऊल पुढे टाकत सकारात्मकता नव्या अध्यायावर आज पुन्हा विश्वासार्हतेची मोहर उमटली . शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक , बारीवाडा , मन्यारवाडा , कारागीर चौक हा सर्व परिसर संवेदनशील मानला जातो. गेल्या तीस – चाळीस वर्षात या भागात किरकोळ कारणावरून जातीय दंगली होऊन दोन्ही समाज घटकातील निष्पाप तरुणांना आणि परिवारांना त्याचे विनाकारण परिणाम भोगावे लागले आहेत . या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रार्थनास्थळासमोरून जाणाऱ्या गणेश मूर्तीवर आणि भक्तांवर प्रार्थनास्थळातून पुष्पवृष्टी केली , कार्यकर्त्यांचा सत्कार केला व सामाजिक सलोख्याचे पहिले पाऊल टाकले . दुर्गा उत्सव काळातही मानाच्या सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील व पदाधिकाऱ्यांचा मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी व पंच कमिटीने सत्कार केला . त्याची परतफेड आज ईदच्या दिवशी हिंदू बांधवांनी करीत त्याच पावलावर पुढे पाऊल टाकत जातीय सलोख्याचे वातावरण अधिकच दृढ केले . अँड एल के शिंदे , राजेश शिंदे , प्रशांत दाणी , यांनी या कामी पुढाकार घेतला . आज ईदच्या सकाळच्या नमाजनंतर प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी विवेक लवांड , लोक नियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद , पोलीस निरीक्षक कैलास नागरे , माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजाचे मौलाना हाफिज अख्तर नूरी , पंच नूर अहमद मोहम्मद हसन , गुलाम शेख , मोहम्मद रफी , शेख इलियास तसेच शेख मुस्ताक शेख अब्दुल्ला , शेख मोहम्मद यांचा शाल , गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांवर पुष्पवृष्टी करण्यात आली . जिथे दंगलीत दगड , विटा आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचा खच पडत असे तिथे फुले उधळली गेली . या भागातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन गेल्या दिड दोन महिन्यात दिसुन येत आहे बदललेल्या ह्या परिस्थीती ही रावेर शहरासाठी एक उत्तम प्रेमाची प्रतिक आहे या अनोख्या प्रंसगी माजी उपनगराध्यक्ष पद्माकर महाजन , नगरसेवक आसिफ मोहम्मद , अॅड सुरज चौधरी , राजेंद्र महाजन , ज्ञानेश्वर महाजन , दिलीप कांबळे , बाळू शिरतुरे , गोपाल बिरपन , राहूल अस्वार , पोलिस उपनिरीक्षक शीतल कुमार नाईक , गोपनीय विभागाचे पुरुषोत्तम चौधरी , राजेंद्र करोडपती , यांच्यासह शेकडो हिंदू मुस्लिम बांधव . सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले .

________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!