शेतकरी हा अस्मानी सह तलाठी यांच्या संपामुळे चिंतेत भर..

रावेर – शहर प्रतिनिधी ( ईश्वर महाजन )

दिनांक 17 ऑक्टोंबर – गेल्या दीड महिन्यात झाल्याल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी याचे कंबरडे मोडला असुन कपाशी, ज्वारी, उडीद ,मूग ,मका , त्याचे अतोनात नुकसान झाले असून पिक विमा कंपन्यानी मागील पिक विमा हा साडेसहा हजार होता त्या ऐवजी साडे दहा हजार रुपये केलेला आहे मागील निकष न लावता नवीन पीक विमा कंपन्यांनी निकष लागणार असल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या सात बारा व इतर कागद मागत आहेत ते अल्पभूधारक शेतकरी किंवा अशिक्षित शेतकरी यांना काढता येत नसल्यामुळे गावच्या तलाठ्याचा जवळ जावे लागते परंतु तलाठी हे दोन ते तीन ठिकाणचे पदभार असल्यामुळे त्यांची पण कामाची धांदल होत असते त्यात गेल्या पाच दिवसापासून तलाठी यांचा असलेला महाराष्ट भर संप हा अडचणीत भर टाकत आहे यामुळे अल्पभूधारक शेतकरी याला कोणतेही प्रकारची आपली व्यथा मांडता येत नसल्यामुळे तो हवालदिल झाला आहे मोठे शेतकरी तरी आपली .व्यथा तहसीलदार मॅडम उषाराणी देवगुणे यांच्याकडे मांडू शकतात परंतु अल्प भूधारक शेतकरी याचे बऱ्याच ठिकाणी पंचनामे पण झालेले नाहीत त्यांची तक्रार साधा तहसिल कचेरीतील कारकुन, शिपाई ऐकून घेत नाही मी वस्तुस्थिती आहे त्यामुळे .आधीच कर्जाच्या विळख्यात असलेल्या शेतकरी बांधव व आता गेल्या दोन दिवसापासून पडणारा पाऊस यामुळे अजून हाती येणार कपाशीचे व तोडलेल्या मक्का याला अंकुर येतील यात शंका नाही येणारे थोड फार उत्पन्न ते पण हातातून जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे पिक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा काढणे गेल्या आठवडाभरापासून तलाठी यांचे महाराष्ट्र भर संप असल्यामुळे बंद आहे व पुढचा आठवडाभर ही शक्यता कमीच वाटत आहे त्यात मोठ्या शेतकऱ्यांचे कामे ग्रामसेवक (तलाठी) आधी करून देतात ही तक्रार नेहमी असते 30 आक्टोंबर च्या आधी पिक विमा काढणे असल्यामुळे बरेच शेतकरी पीक विम्यापासून मुकणार असेच दिसत आहे तरी शासनाने लवकरात लवकर संपावर तोडगा निघणे गरजेचे आहे व सामान्य अल्प भुधारक शेतकरी यांना लवकरात लवकर सातबारा काढून पिक विमा काढता येईल तसेच मागे निकषानुसार साडेसहा हजार रुपये पीक विम्याचे रक्कम असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी काही शेतकरी यांनी आमच्या जवळ बोलुन दाखवली..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!