निर्माल्य संकलन अभियानास रावेर करांनी दिला उत्तम प्रतिसाद….
रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
१६ आक्टों रोजी केसरीनंदन प्रतिष्ठान, रावेर यांच्या माध्यमातुन रावेर येथे गणेश उत्सव काळात निर्माल्य संकलन करून प्रत्येक मंडळा जवळ बॅनर लावुन व घरा घरात जाऊन निर्माल्य हे एक पिशवीत जमा करावी व केसरीनंदन प्रतिष्ठान ची संकल्पना ही थोडक्यात प्रत्येकाच्या बोलुन दाखविली त्यास गणेशत्सवात उत्तम असा प्रतिसाद भक्तगण व गणेश मंडळानी दिला व उत्तम प्रतिसाद मिळाला
स्वच्छता म्हणजे रोजचा सण.
नाहीतर कायमचे आजारपण हे ब्रीद वाक्य घेवुन कार्यास सुरवात केली
आज दिनांक 16/10/2021 रोजी केसरी नंदन प्रतिष्ठान,रावेर यांच्या अंतर्गत रावेर शहर परिसरात दुर्गा माता उत्सवाचे औचित्य साधून निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले.नगरातील प्रत्येक भागातील मंडळाना तसेच घरगुती निर्माल्य संकलनाचे आवाहन करण्यात आले होते.यासाठी प्रत्येक मंडळा ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करण्यात आली होती. उत्स्फूर्तपणे शहरातील प्रत्येक नागरिकांनी त्यांचा मोलाचा हातभार या निर्माल्य संकलन अभियानाला लावून पर्यावरण स्वच्छता राखण्यास हातभार लावला , सर्व नागरिकांचे प्रतिष्ठान तर्फे आभार मानण्यात आले. उपक्रम राबवण्यात आला असून श्री दुर्गा माता उत्सव मंडळांनी मदत करावी.या प्रसंगी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते संदीप महाजन,चेतन इंगळे,पंकज महाजन,पवन दाणी, चंद्रकांत राऊत सर,चेतन सोनार,मोनू महाजन,गौरव शिंदे,विकास अमोदकर,चंद्रकांत इंगळे,जिवन महाजन,महेश गडे,जयेश शिंदे,चेतन पाटील,जयेश पाटील भरत शिंदे बंटी महाजन उपस्थीत होते.
________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832