सत्यशोधक महात्मा फुले व्यायाम शाळेतर्फे झाला व्याख्यानाचा कार्यक्रम….
रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
विजया दशमी अर्थात दसरा ज्या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंका पती रावण यांस धाराशाही करून विजयी पताका फडकवत अयोध्दा नगरीत प्रस्थान केले होते तो दिवस विजया दशमी होय
रावेर येथे हयाच मुलतत्वाला अनुसरून रावेर येथील महात्मा जोतीबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या प्रेरीत होवुन गेल्या सात वर्षा पासुन काही तरुण एकत्र येवुन सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले व्यायाम शाळेची स्थापना केली त्यात तरुण हा निर्व्यसनी कसा राहील व्यायामाकडे कसा वळेल विविध उपक्रम घेण्यात येता चुकीच्या चालीरीती याला थारा न देता सत्यशोधक याच्याकडे कशी वाटचाल करेल यासाठी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष योगेश महाजन सातत्याने प्रयत्न करीत असतात त्यात त्यांना मोलाचे योगदान हे सर्वमित्रपरिवार व व्यायाम शाळेचे कार्यकर्ते यांचे मिळत असते विजयादशमीच्या दिवशी रात्री झालेल्या कार्यक्रमात व्याख्यानासाठी आलेले श्री राहुल दादा पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी शोषित वंचित समाजावर होणाऱ्या अन्याया उभे राहून अन्याया विरोधात एक लढा दिला तसेच एक समाज व्यवस्था बदलविण्यात एक मोठी क्रांती आणली दलीत लोकांवर होणारा अन्याय , सती पथा स्त्री शिक्षण , विशीष्ठ लोकांनीच शिक्षणाचा लाभ घ्यावा या गोष्टीला थारा न देता स्वतः आधी शिक्षण घेतले नंतर आपली पत्नी सावित्री हिला शिकवले नंतर मुलींची पहिली शाळा काढण्यात मदत करून त्यात सावित्रीबाई फुले यांना पहीली शिक्षिका म्हणून शिकवण्या .सन्मान दिला अन्यायाविरोधात नेहमी लढत राहिले कोणतेही कार्य हे त्यांचे जन्मजात नसून आपल्या शिक्षणावर आपण स्वतःला घडू शकतो सिद्ध केले ते करून दाखवले महात्मा फुले यांनी बरेच पुस्तके लिहले त्यात शेतकऱ्याचा आसूड अशे कितीतरी पुस्तके व त्यांचे वाचण्या सारखे आहेत तरुणांनी ते वाचन करावे कार्यक्रमास माळी समाज माजी अध्यक्ष श्री .संजय विठ्ठल महाजन यांनी पण मत मांडले तसेच श्री पद्माकर महाजन , श्री भास्कर दादा महाजन, श्री उमेश महाजन , श्री पांडुरंग दादा शिंदे श्री बाळू रामदास महाजन पत्रकार श्री ईश्वर महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सत्यशोधक व्यायाम शाळेचे कार्यकर्ते ‘ अध्यक्ष श्री .योगेश महाजन श्री गणेश महाजन ‘ संदीप महाजन .रवी पाटील , विजय रमेश महाजन ,बाळा महाजन पवन शांताराम महाजन , गोपाळ महाजन ,कल्पेश चौधरी ,बंटी महाजन , कल्पेश महाजन , निलेश महाजन , ‘अशी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनी महाजन यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी .तरुणांनी व्यसनाकडे न .वळता व्यायामा कडे लक्ष द्यावे हा मोलाचा संदेश देण्यात आला दुध वाटप करून क्रार्यक्रमाचा समारोप केला.
_____________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832