संभाजी ब्रिगेडची रावेर पालिका निवडणुकीत ठरणार किंगमेकर- मोरेश्वर सुरवाडे

रावेर शहर प्रतिनीधी- (ईश्वर महाजन),

काल झालेल्या बैठकीत रावेर येथील संभाजी ब्रिगेड पक्ष रावेर नगरपालिका निवडणूक सर्व प्रभागात सर्व जागांवर लढवणार आहे. त्याची पूर्वतयारी पूर्ण झालेली काल झालेल्या स्वामी विवेकानंद विद्यालय रावेर येथे आमदार शिरीष दादा यांच्या महाआघाडी एकत्रीत लढण्याच्या संदर्भात स्थानिक नेते अनुकुलता दाखवत आहे त्या संदर्भात संभाजी बिग्रेड हयांची बैठक अती महत्वाची ठरली असून त्यांचा ओढा हा जास्तीत – जास्त तरुणांना संधी देण्यात येईल असा आहे रावेर मतदार सध्याच्या सर्व नगरसेवकावर नाराज असल्याची स्थिती रावेरकरात दिसत आहे व भाजप आघाडी करते की स्वबळाचा नारा पुढे येतो काही दिवसात कळेलच, प्रभाग संरचना आणि आरक्षण निघाल्यानंतर उमेदवार निश्चित करणार आहेत. काल दसरा निमित्त आयोजित संभाजी ब्रिगेड च्या बैठकीत रावेर शहराध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे यांनी सांगितले.

सदर बैठक रावेर शेतकी संघाच्या सभागृहात झाली. त्या अगोदर रावेर शहरातील तसेच तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तामसवाडी येथील ओंकारेश्वर मंदिरावर महादेव पूजन केले. त्यानंतर रावेर शहरातील पंचमुखी हनुमान आणि महाकाली मंदिरावर जाऊन आरती केली. सावदा रोडवरील दर्गावर ही कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.

संभाजी ब्रिगेडचे रावेर शहराध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे यांनी बैठकीत उद्घोषणा करतांना सांगितले की, रावेर संभाजी ब्रिगेड स्वबळावर रावेर पालिकेची निवडणूक लढवणार आहे परंतु त्यांनी एक मार्ग खुला केला आणि इशारा केला की जर कोणी पक्ष किंवा पॅनल आमच्या सोबत येत असेल तर आपण त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवू. तो पक्ष कोणताही आघाडीतील पक्ष मागील काही पंचवार्षिक मध्ये रावेर नगरपालिकेची निवडणूक हे काही कोणत्या पक्षाने आणि पक्षाच्या चिन्हाने लढवली नाही. यावेळेस फक्त संभाजी ब्रिगेड हाच पक्ष चिन्हावर लढणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले की आमचे संभाजी ब्रिगेडचे कमीत कमी चार नगरसेवक पक्के निवडून येणार आहेत, ते निश्चितच आहे. तसेच इतर जागांवर जे उमेदवार हरणार पण ते हरुनही जिंकणार कारण बऱ्याच बलाढय उमेदवार यांना पाडण्यात कारणीभुत ठरणार आहेत, ते असे की त्या त्या प्रभागात संभाजी ब्रिगेड चे उमेदवार काही प्रस्थापितांना हादरा देणाऱ्यास कारणीभूत ठरणार आहेत, येत्या काळात संभाजी ब्रिगेडचे न पा ताकद दिसणार आहेच

सदर बैठकीस रावेर शहरातून आणि तालुक्यातून शंभरच्यावर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात विनोद चौधरी, योगेश महाजन, मोरेश्वर सुरवाडे, प्रशांत पाटील, महेश महाजन, अमोल महाजन, राजू चौधरी, विशाल धनगर, मनीष तायडे, योगेश माळी, शेख इम्रान, अफरोज खान, अजित तडवी, कादर तडवी, कृष्णा माळी, नरेंद्र माळी, नरेंद्र महाजन, नितीन सोनार, सतीश दुबे, जावेद खान, जाकीर मिस्त्री, विनोद पाटील, सलीम खान, अजय पाटील आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!