शासनाची परवानगी नसतांना देवीची विसर्जन मिरवणुक काढाल तर मंडळावर गुन्हे दाखल होणार जणु काही दिला इशाराच !

रावेर शहर प्रतिनीधी-(ईश्वर महाजन)

दि. १५ ऑक्टो विजया दशमी हया दिवशी अहिरवाडी गावात देवीचे विसर्जन करण्यात येते त्यानुसार अहिरवाडी गावात विसर्जनाची मिरवणुक काढण्यात आल्या पंरतु एक अति उत्साही मंडळ नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ अहिरवाडी यांच्या कार्यकर्ते यांनी दि १५ ऑक्टो 20२१ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यत्न अहिरवाडी गावात पारंपारिक विसर्जन मार्गावर मिरवणुक काढून शासनाचे नियमाचे उल्लघन केल्या कारणावरून रात्री साडे बारा च्या दरम्यान नव युवक दुर्गा उत्सव मंडळावर व ४१ अध्यक्ष व उपाध्यक्ष सहीत सदस्य यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला रावेर पोलीस स्टेशन मध्ये CC TN S 350 / 20 21 भादवि कलम १८८, ३४ गुन्हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ [ १ ] [ ३] १३५ प्रमाणे नव युवक दुर्गा उत्सव मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला. फीर्याद ही पो कॉ रुपेश डिगंबर तोडकर यांनी दिली आहे तर तपास मा पोलीस निरीक्षक कैलाश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नितीन डांबरे करीत आहे .अहिरवाडी गावात शांतता असुन रावेर पोलीस स्टेशन मधील सर्वमंडळाना एक प्रकारे पी .आय कैलाश नांगरे यांनी कायदयाचे उल्लंघन कराल तर गुन्हा दाखल होणारच इशाराच दिला आहे.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!