सामाजिक समता मंच रावेर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिवस समारोह संपन्न..

बौध्द धम्मामुळे आपली जगात नवी ओळख– युवा विचारवंत बृहद्रथ सुर्यवंशी यांचे प्रतिपादन..!

रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )

आज 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन व मा. कांशीराम जी यांच्या 15 व्या स्मृती प्रित्यर्थ निमित्त सामाजिक समता मंच रावेर यांच्या वतीने जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या बौध्द धम्मामुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून विचार पुर्वक या देशाच्या मातीतुन जगात पसरलेला परंतु याच देशातुन हद्दपार झालेला धम्म या देशातील लोकांना देऊन त्यांची जगात एक नवीन ओळख निर्माण करून दिली.असे प्रतिपादन राष्ट्रीय विचारवंत बृहद्रथ सुर्यवंशी तथा संजय सुर्यवंशी यांनी रावेर येथील सामाजिक समता मंचतर्फे आयोजित ६५व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त कार्यक्रमात मत व्यक्त केले.
रावेर येथील सौ.कमला बाई एस अग्रवाल मुलीची . हायस्कुल येथील जिमखाना हॉलमधे आयोजित कार्यक्रमात सूर्यवंशी पुढे बोलताना म्हणाले ज्या देशातून निर्माण झालेला बौध्द धम्म आज नेस्तनाबूत करण्यात आले होते. पहीले धम्मचक्र भगवान बुध्दांनी अडीच हजार वर्षापूर्वी गतीमान केले, दुसरे दिड हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने तर तिसरे धम्मचक्र ६५ वर्षापूर्वी डॉ.बाबासाहे आंबेडकर यांनी फिरवून आपल्याला बौध्द धम्म दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहुन महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की या देशातील महीलांवर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार असून प्रत्येक महीलेने महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचावे त्यांच्या पुस्तकांचे अध्ययन करावे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमात तहसिलदार उषाराणी देवगुणे,नायब तहसीलदार संजय तायडे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा कांता बोरा, नगरसेविका शारदा चौधरी, रंजना गजरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विनोद चौधरी, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे चंदन बिर्हाडे, रमेश सोनवणे, प्रमोद चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविक सामाजिक समता मंच चे कार्याध्यक्ष उमेश गाढे, सूत्रसंचालन नगीनदास इंगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजू सवर्णे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले.

_________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!