रावेर नगरपालिका ने द्यावे रावेर वासीयांच्या आरोग्याकडे लक्ष
रावेर शहर प्रतिनीधी : (ईश्वर महाजन)
रावेर शहरात नगर पालीकेत कर्मचारी नसल्याने पुर्ण कामे ही अंधेरी नगरी चौप्पट प्रजा अशी सुरु आहेत गेल्या दिड महीन्या पासुन मुख्यधिकारी व बांधकाम विभागात कोणीही अधिकारी नाही त्या जागी सावदयाचे मुख्यधिकारी चव्हाण आहे व नगर बाधकाम प्रभारी म्हणून राणे हे मंगळवार व गुरुवार येथे येत असतात त्यामुळे जवळपास पूर्ण रावेर नगर पालीका ही सहा ते सात कर्मचारी सांभाळत आहेत त्यांचे सर्व व्यवहार हे नगरसेवकच सांभाळतात हे वास्तव असले तरी ते शासकिय नाहीत हे उघड आहे नगरपालीकेत ग्रामीण भाग हा नगर पालीकेत लागल्याने जवळपास १० कर्मचारी पदे रिक्त आहेत त्यात रावेर आरोग्य विभाग साभाळणारे नगरसेवक हे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे सध्या प्रत्येक नगर सेवक यांचे उदीष्ठ दोन महीन्यात (आंचार संहीता लागण्याच्या ) आधी जेवढे बांधकाम हे होतील तेवढे करून घ्यायचे यात त्यांच व नपा अधिकारी कर्मचारी व नगर सेवक यांचे वेगवेगळ्या प्रकारे हित संबध जोपासली जातात आर्थिक पण यात शंका नाही सफाई कर्मचारी हे ठेकदारी पद्धतीने काम करीत असल्याने त्यांना पूर्ण रावेर येथील समोरच्या भागात दिसणारा कचरा जमा करणे टैक्टर टॉली व कचरा गाडी यांच्या मध्ये जमा करून कचरा हा नगर पालीका यांनी नेमलेल्या कचरा विल्हेवाट लावायचे हे काम सफाई कर्मचारी व त्यांचे कॉन्टॅक्ट दिलेल्या इसम अजिबात करताना दिसत नाही आहे रावेर येथील बराच कचरा हा जिथे ओळोसा असे अश्या भागात फेकला जातो किवा सावदा रोड मार्गे बायपास जाणारा जो सिद्धार्थ नगर व नाल्याच्या भागात जोडला जातो त्या रस्ता ला लागुन असलेली पाण्याच्या जी पुर्ण शहर भराचे पाणी वाहून नेत असते त्यातच हे कचरा टाकला जात आहे याकडे कोणीही लक्ष देत नसुन फक्त बघ्याची भुमिका घेतली जात आहे जाणकार नागरिकांनी वृत संकलन टीमला लक्षात आणुन दिली हा प्रकार रावेर भर सुरु आहे या वर कडक कारवाई होणे गरजेचे आहे जेणे करून ह्या नागझिरी मार्गे वाहत येणार पाणी थांबु नये डासाचे प्रमाण वाढू नये डेंगु , मलेरिया व अश्या रोगाचा प्रसार होवु नये म्हणून रावेर नगरपालिका ने योग्य ती काळजी घेणे जरुरी आहे .
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832