सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का.!

रावेर शहर प्रतिनीधी :- ( ईश्वर महाजन )

रावेर मुक्ताईनगर तालुक्यातील ये जा करण्यासाठी पुनखेडा मार्गे बहूतेक वाहतूक होत असते त्यासाठी रावेर मार्गे पुनखेडा हे तीन किलोमीटर अंतरावर आहे तेथील भोकर नदी ही पुनखेडा गावापासून वाहात जाते व सध्या पाऊस हा गेल्या महिन्याभरापासून पडतं असल्यामुळे पुनखेडा पुल हा वाहनांसाठी जवळपास बंदच आहे पुलाची उंची फार कमी असल्याने व तुटलेला अवस्थेत दिसत असून तो पुल हा कधी ही वाहून जाऊ शकतो किंवा पावसाच्या तुटू शकतो त्याला मोठ मोठे भेंगा खड्डे पडल्याचे निर्देशान येत आहे ही वस्तु दिसत असतांना देखील बरेच वाहन तिथुन येजा करीत आहे व तिथे बरेच गड्डे करण्यात आलेले आहे एखादे वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता आहे व पुन खेड़ा गावातल्या रहवासी यांना रात्री-अपरात्री कोणाची तब्येत खराब रुग्णालयात जायचे झाल्यास पातोंडी मार्गे स्टेशन जिथे रेल्वे स्टेशन असल्यामुळे ती गेट जवळपास बऱ्याच दा बंदच असते त्यामुळे दहा मिनिटांमध्ये रावेर येथे रुग्णास आणु शकतो परंतु आता एक तास लागतो याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देण्याची गरज आहे लवकरात लवकर हा नवीन पुल बांधकाम करण्यात यावे अशी बरेच नागरिक विनंती करीत आहे..

___________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!