तहसील कार्यालय, रावेर येथे लिगल अवेअरनेस आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणा कडुन व तहसिल कार्यालयाकडून पुरविल्या जाणा-या सेवा संदर्भात जनजागृतीपर शिबीराचे आयोजन करण्यात आले..

रावेर शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

दि. ७ आक्टो . विधी सेवा प्राधिकरण, मा. सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार, मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय, मुबई आदेशान्वय तालुका विधी सेवा समिती रावेर व तालुका वकील संघ, रावेर यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि.०7 ऑक्टोंबर २०२१ लिगल अवेअरनेस व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडुन तसेच तहसिल कार्यालयाकडून पुरविल्या जाण-या विविध पुरविल्या
जाणा-या सेवांसंदर्भात तहसीलकार्यालय, रावेर येथे जनजागृतीपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीरात सामान्य जनतेला पॉम्प्लेट्स वाट्न लिगल अवेअरनेस व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून पुरविल्या जाणा-या तसेच तहसिलकार्यालयाकडून पुरविल्या जाणा-या विविध योजनाबद्दल प्रभारी तहसिलदार श्री संजय तायडे यांनी उपस्थीतांना दिली. तर संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, व ज्येष्ठनागरीक कायदा 2007 या बाबत सविस्तर माहिती सावदा सर्कल श्री. भंगाळे यांनी दिली.यावेळी ज्येष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील व प्रा. एस. बी. महाजन सर यांनी सुध्दा उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
आयोजित शिबीरासाठी तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. योगेश गजरे, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री.दिपक तायडे, सौरभ तडवी, लोकपाल महाजन, पॅरा लिगल वॉलेंटीयर्स श्री राजेंद्र अटकाळे ,दयाराम मानकरे गुरुजी,सौ.वर्षा पाटील तहसिल कार्यालयाचे सर्कल विठोबा पाटील, सचिन पाटील, शेळकर अप्पा, तलाठी दादाराव कांबळे, फोजदारी लिपीक प्रविण पाटील,मनोज लडके, व लोलपे, आदी कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी वरीष्ठ लिपीक श्री.व्ही. डी. मोरे, भुषण महाजन क. लिपीक, अतिश काळे क. लिपीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.

____________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!