रावेर महसुल प्रशासन व वाळू माफीया यांचे संगमताने होत आहे महसुल चोरी.!
रावेर – शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )
रावेर तालुक्यात गेल्या काही महीन्यापासुन वाळु वाहतुकीचा परवाना हा मध्यप्रदेशचा दाखवुन शासनाच्या महसुल बुडविण्याचे काम सुरु आहेत त्यात भर टाकत उटखेडा , प्रिपी ‘ सुकी नदी ‘अटवाडा , दोधा , केन्हाळा , पाल , भोकर ‘ निभोरा या भागातील नदीतुन चोरटी वाळू वाहतुक होत आहे प्रत्येक दिवशी संधाकाळी पाच नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यन्त महसुल विभागाच्या काही अधिकारीच्या व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने पोलीस प्रशासनच्या काही सहकार्याने व राजकिय जिल्हा परीषद पचायत समीती यांचे काही सदस्य राजकीय नेत्याच्या नेत्याच्चे नातेवाईक ह्या अवैध वाळु माफीया चोरी मध्ये धागेदोरे जुळलेले ह्या निर्देशांकात येत आहे महसुल प्रशासनाची प्रंचड प्रमाणात यात नुकसान असुन अधिकारी व इतर सर्वाचे उत्तम असे आर्थिक रसद खिशामध्ये जात आहे हे काम सर्व मिळून सुरु असल्यामुळे यात तालुकाभरातील पाचशे ते सहाशे टॅक्टर व डंपर हे अवैध वाळू होत असते तर शनीवार व रविवार व प्रशानिक सुट्टीच्या दिवशी जवळपास हजार अवैध वाळूचे टॅक्टर डंपर यात काम करत असुन फक्त एक शासनाला दाखविण्याकरीता कधीतरी एक दोन अवैध टॅक्टर वर कारवाई केली जाते सपूर्ण तालुकाभर अवैध वाळू चोरटी प्रकार सुरु असुन याकडे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे यात प्रशासनाचा महसुल करोडो रुपयाचा बुडत असुन हा प्रकार सर्वाच्या सगममताने सुरु आहे हे नक्की दिसत आहे.
______________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832