रस्त्यावरील गड्डयाने घेतला निष्पाप महीलेचा बळी

रावेर शहर प्रतिनीधी:- ( ईश्वर महाजन )

आईच्या अंतदर्शनास जाणाऱ्या मुलीचा अपघाती मुत्यु

सविस्तर बातमी अशी की, खानापुर येथील रहीवासी जनार्दन धांडे यांची आई तुळ साबाई बाबुराव धांडे (वय ९० ) वृद्धापकाळने सध्याकांळी सहा वाजता निधन झाले त्याकरीता मुलगी आशाबाई प्रेमचंद चौधरी राहणार मस्कावद वय ६१ यांना वृत कळताच मुलगा चेतन सोबत खानापुर येथे येत असताना आईच्या अंत दर्शन व अतिम संस्कार सकाळी होणार होते पण आई व मुलीची माया असल्यामुळे आशाबाई रात्रीच आपल्या मुला सोबत मोटार सायकलवर निघाल्या पंरतु रात्रीची ८ ची वेळ त्यात भोकरी गावच्या पुढे राजेश्वरी हॉटेल जवळ रस्त्या मध्ये असणाऱ्या अनेक लहान मोठे भरपुर प्रमाणात गड्डयामुळे एका मोठ्या रस्त्यावरील मोठ्या गढ्यात तोल जाऊन आशाबाई प्रेमचंद चौधरी ह्या डोक्यावर पडल्या त्यात त्याचा गंभीर इजा होवुन जखमी झाल्या त्यांना ग्रामीण रुग्णालय रावेर येथे आणण्या त आले पंरतु डोक्यातुन भरपुर रक्तस्त्राव झाल्याने त्या मृत्यू पावल्या. घटना स्थळी काही लोकांनी १०८ रुग्णवाहीका ‘ (अब्युलेन्स ) फोन करून बोलविली पंरतु आल्यानंतर ती गाडी स्टार्ट होत नसल्याचे निर्देशास आले काही तरुणांनी अब्युलेन्सला धक्का दिला तेव्हा गाडी स्टार्ट याचा अर्थ ॲब्युलेन्सने पण एक प्रकारे धोका दिला अशी प्रतिक्रिया तरुणांनी दिली तसेच मागील कारोना काळात आमदार शिरीष दादा चौधरी यांनी कोरोना निधी साठी आलेल्या एक कोटी रुपयातील रावेर व यावल येथे काडीकर्ल अद्यावत ॲब्युलेन्स देऊ त्या निधीतुन परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे तो निधी वापरला नाही यावल ग्रामीण रुग्णालय येथे ॲब्युलेन्स आमदार निधीतुन दिली पंरतु एक कोटी रुपये रुपयाचे काय झाले एक कोडंच वाटतय रावेर व तालुक्यातील जनतेचा फक्त मतासाठी वापर केला जाईल हाच प्रश्न पडलाय सामान्य जनतेला !

_________________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!