ओला दुष्काळ जाहीर करावा भाजपा किसान मोर्चा रावेर तालुका यांनी दिले निवेदन..
रावेर – शहर प्रतिनिधी- ( ईश्वर महाजन )
आज दि. 30 सप्टेंबर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानी बाबतीत भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा रावेर तालुका उ म . किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश भाऊ धनके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले प्रमुख मागण्या हया प्रकारे कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता ओला दुष्टाळ जाहीर करावा , शेतकऱ्याचे आज पर्यत्नचे कृषी पंपाचे वीज बीज बिनशर्त माफ करावे , कोरडवाहू शेतकरी यांना पन्नास हजार रुपये एकरी प्रमाणे मदत करावी , बागायत क्षेत्रसाठी एकरी एक लाख प्रमाणे मदत त्वरीत मिळावी तसेच २०१९ – २०२० ह्या वर्षांत झालेल्या नुकसानीचे पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी , शासनाने शेतकऱ्याना कर्ज माफी करावी सरकार हे शेतकऱ्यांना कोणतेही मदत जाहीर करत नसुन फक्त वेळ काढुपणा करीत आहे असे निवेदन तहसिलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांना देण्यात आले त्या प्रसंगी राहूल गोपाळ महाजन किसान मोर्चा ता . अध्यक्ष, सि. एस . पाटील (सर) सरचिटणीस रावेर तालुका , पराग पाटील अध्यक्ष भाजपा शहर हरलाल कोळी तालुका उपाध्यक्ष, अँड. सूर्यकांत देशमुख भाजपा वकील आघाडी , प्रदीप धांडे, किरण गुलाबराव पाटील, राजेद्र हुकुमचंद पाटील, परमेश्वर सोनार, हेमंत धनगर , रंजनीकांत बारी , राहूल पाटील कार्यकर्ते उपस्थीत होते.
_________________________________________________________________________________________________________________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832