रावेर ला पंचायतराज समीती समोर गाजला दलीत वस्ती सुधार योजनेचा मुद्दा.!
रावेर शहर प्रतिनिधी – ( ईश्वर महाजन )
२८ सप्टेंबर रोजी आलेल्या पंचायत राज समीतीचे गट प्रमुख यांच्या समोर दलीत वस्ती सुधार योजनेच्या ई – टेंडर प्रक्रीयेत जि . प . प्रशासन व्दारे सुरु असलेल्या चौकशीचा संबंधी अहवाल जि . प . कडे सुपूर्द करून कारवाई करण्यात आली तसेच त्यासंबधीत वस्तुस्थीती अहवाल रावेर सादर करण्यासंबधी आदेश गट विकास अधिकारी तसेच संबधीत विभागाने सादर करावे असे पंचायत राज गटप्रमुख अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी माहीती दिली.
आमच्या दै.महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की,रावेर पंचायत समीती कामाबद्दल आम्ही असमाधानी आहे. रावेर तालुक्यातल वैयक्तीक लाभाच्या योजनेचा जणु फडश्या पडल्याचे समितीला दिसून आले पंचायत समीती प्रशासक व सत्ताधारी यांनी नियमाचे व योग्य अशी शाहनिशा न करता एकाच कुटुंबातील पाच व्यक्तीना लाभ दिल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते आनंद बावीस्कर यांनी केले, त्यांच्या निवेदनाचे योग्य उत्तर न देणे, सावखेडा येथील वाल्सल्य ब्युटी पार्लर प्रकरण , ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस ‘ खोट्या दिव्याग प्रमाण पत्राचा वापर करून आठ ग्राम सेवक बदली प्रकरण, अश्या बऱ्याच मुद्यावर रावेर पंचायत समीती वादात आहे पाल ग्रामपंचायत कार्यालय व महाआवास आदीवासी कुंटूबा साठी योजना उत्तम प्रकारे काम करीत आहे त्याप्रसंगी आ . माधवराव जवळगावकर ,आ . डॉ देवराव होळी व रावेर आमदार शिरीष दादा चौधरी ,रावेर पंचायत समितीचे सभापती कविता कोळी , रावेर गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल सर्व रावेर पंचायत समितीचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832