रावेर पंचायत समीती मधील उपसभापती पदावरुन रंगला वाद
रावेर शहर प्रतिनीधी 🙁 ईश्वर महाजन )
आज २५ सप्टेंबर दुपारी दीन दयाल उपाध्याय जंयती निम्मीत व प्रतंप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसा निम्मीत रावेर खासदार रक्षा ताई खडसे व जिल्हा परिषद सदस्य तसेच तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थीत होते त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल भरगच्च भरल्याचे दिसत होते ह्या कार्यक्रमात काही दिव्याग .बांधवांना साहीत्य वाटप करण्यात आली तसेच गरीब परिवारातील परिवारास किराणा किट वाटण्यात आले व काही शेतकरी बंधु व भारतीय जवान यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर तालुका वैद्यकीय डॉ . यांच्या कार्यालयच्या उद्घाटन नंतर सर्व भाजपच्या महीला बसल्या असतांना खासदार रक्षाताई खडसे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील व पंचायत समीती सभापती कल्पना ताई कोळी यांच्या समक्ष रावेर .पंचायत समीती सदस्या योगीता ताई यांचे अश्रु अनावर झाले प्रत्येकाला ठरलेल्या प्रमाणे सभापती व उपसभापती दिले जात आहे माझ्यावरच का अन्याय केला जातोय सदरहून १५ ऑगस्ट ला नवीन उपसभापती म्हणजे योगीता ताई वानखेडे यांची निवड करणे गरजेचे होते जे स्व . आमदार हरीभाऊ यांनी ठरविण्यात आले होते परंतु त्यांच्या जाण्याने तसेच नाथा भाऊ यांच्या पक्ष सोडल्या नंतर रावेर तालुक्यात दोन ते तीन तट जिल्हात तर तालुक्यात दोन तट उघड उघड दिसत आहे एकाच समाजाच्या जेष्ठ नेते तालुका अध्यक्ष व उपसभापती असल्याने त्यांचे पारडे जड दिसत आहे तर आता ज्यांना पद दिले जाणार होते ती सदस्या सामान्य कुटुबातील असुन कोणत्याही प्रकारचा राजकिय वारसा नाही व त्यामुळे डावलेले जात आहे यांचे पुढच्या . स्थानिक निवडणुका जि.प . प समीती यात दुरोगामी पडसाद दिसल्या शिवाय राहणार नाही राजकीय वर्तुळात याबद्दल तर्क विर्तक लावण्यात येत आहे….
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832