रावेर शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली,एकास अटक..

रावेर शहर प्रतिनिधी : ( ईश्वर महाजन )

दि.२४ च्या रात्री साधारण: १२ ते ३ च्या दरम्यान रावेर बन्हाणपुर मार्गावरील सचीन महाजन यांची खानावळ , स्वामी ट्रेडर्स संचालक दिपक बाबुराव महाजन यांची सिमेंट आसारी चे दुकान, गोवर्धन नगर बऱ्हाणपुर रोड लगत तसेच मोहन किराणा व शिवसाई ट्रेडर्स यांच्या दुकानांच्या शटर फोडून चोरी करण्यात आली.

सविस्तर माहीती अशी की, रावेर येथील सचीन महाजन यांच्या जेवणाच्या खानावळीचे पत्रे फोडून तेथील नुकसान करीत दुकानातील गल्ला तील काही चिल्लर घेवुन गेल्याचे दिसत आहे तर गोवर्धन नगर नगर जे गावाच्या दत्त टोलकाटा पंपाच्या समोरच आहे तेथील स्वामी ट्रैडर्स जे सिमेन्ट आसारी यांचे संचालक दिपक महाजन यांचे पश्चीम साईडने पत्रे फोडून दुकानातून सिसीटीव्ही कॅमेरा असणारे सर्व काम्युटर कामाच्या डायरी व काही चिल्लर रुपये जवळपास १५ ते २० हजार रुपये घेवुन प्रसार झाले तसेच छोरीया मार्केट मध्ये १ ते २ वाजेच्या दरम्यान शिवसाई गोळ्या बिस्कीट व यांचे किरकोळ विक्रीचे दुकानाच्या पुर्व बाजूच्या साईडने शटर फोडून दोन ते तीन हजार रुपयाची चिल्लर घेवुन गेले नंतर मोहन किराणा यांच्या दुकानात दोन चोर यांनी शटर वाकवुन त्यात किराणा दुकानात प्रवेश केल्याचे दिसले अर्धे शटर लावुन घेतल्याचे सिसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे, ही घटना रात्री फीरणारा गोरखा याला दुकानांचे शटर अर्धे उघडे दिसल्याने त्यांने लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला पो. कॉ श्रीराम कानगे व त्यांचे तीन सहकारी त्वरीत आल्या नंतर त्यांनी दोघा चोराचा पाठलाग केला त्यात एक चोर हा पडण्यात यशस्वी झाला तर एक चोरास पकड्यात पोलीसांना यश आले त्यांला अटक केली असुन पुढील चौकशी सुरु आहे.

पंचनामे धीम्या गतीने

परंतु घटना स्थळी दैनिक महाराष्ट्र सारथी ची टिम वृत्त संकलन करण्यासाठी पोहचली होती .परंतु १२ वाजे वाजेपर्यंत चोरी झालेल्या दुकानाचे पंचनामे झालेले नव्हते याचा अर्थ पोलीस प्रशासन एवढया नरमाई कामे का करीत आहेत हा प्रश्न पडतो पोलीस स्टेशन येथे स्वतः संपर्क केल्यावर ही तेथे डूट्यी असलेले पोलीस व तपास अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. संपर्क केला असता सदरहून पोलीस स्टेशन मधुन कोणतेही अधिकाऱ्यांना माहीती मिळाली नाही असे सांगन्यात आले,याचा अर्थ पोलीस प्रशासन ह्या घटनेस किरकोळ घटना मानत आहे हे निर्देशनास येत आहे. मागच्या आठवड्यात ही अशीच एक तडवी कॉलनीतील घरात चोरी झालेली असुन तपास चालु आहे हेच उत्तर मिळत आहे रावेर शहरात व तालुक्यात ह्या चार दुकानाची चोरी मुळे चर्चा आहे जरी एक चोर पकड्यात यश आले असले तरी पंचनामे होणे व अजुन कोणी यात टोळी कार्य करीत आहे का? हे पोलीस प्रशासन समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!