बनावट लेटर पॅड व सही . स्कॅन चा वापर करीत रावेर ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली सदर्भात मंत्रालयात अर्ज….
रावेर शहर प्रतिनीधी – ईश्वर महाजन
रावेर ग्रामीण रुग्णालयलयातील एक चिंतन नीय प्रकार…
रावेर पोलिसात तक्रार दाखल…
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ…
बनावट लेटर पॅड चा वापर करून येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी एन डी महाजन यांनी गडचिरोली /मेळघाट ह्या अतिदुर्गम भागातील जिल्ह्यात बदली करण्यासंदर्भात मंत्रालयात अर्ज केला असल्याचे एका झारीतील शुक्राचार्यांनी उपद्व्याप केला असून त्या विरोधात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महाजन यांनी रावेर पोलिसात तक्रार दिलेली आहे.
याबाबत पोलिसांनी सुद्धा दुजोरा दिला असून तपास सुरू असल्याचे पो. उपनिरिक्षक शितल कुमार नाईक यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की रावेर येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी यांना डॉ. एन . डी महाजन यांनी मंत्रालयाकडे आपली बदली गडचिरोली/मेळघाट जिल्ह्यामध्ये करण्यासंदर्भात अर्ज करून मी बाल रोग तज्ञ असल्याने माझी इच्छा आदिवासी लोकांची सेवा करण्याची आहे म्हणून माझी म्हणून बदली करण्यात यावी. असा येथील एका उपद्व्यापी (ज्याला पुर्ण माहीती आहे असेच व्यक्ती ) झारीतील शुक्राचार्य ने ग्रामीण रुग्णालयाच्या बनावट लेटर पॅडचा वापर करून त्या बनावट लेटरपॅडवर वैद्यकीय अधिकारी श्री महाजन यांची सही स्कॅन करून खोटा जावक नंबर टाकून मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे अर्ज केल्याचे उघड झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी यांनी महाजन यांनी सांगितले की मी असा कोणताही अर्ज केलेला नाही माझ्या नावाने मी बदली मागणी करतो आहे असा बनावट अर्ज तयार करून मंत्रालयाकडे पाठवला असल्याने त्यांनी येथील पोलीस स्टेशनला काही पुरावे सादर करत या प्रकरणाची चौकशी करून हे काम दोन तीन संबधीतच व्यक्ती यात रॅकेट असु शकते शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई कठोर करण्याची मागणी केली असून पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दुजोरा देत म्हटले आहे की आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत तपास झाल्यानंतर सर्व काही समोर येईल. डॉक्टर महाजन यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की मी तीन वर्षापासून येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेमी माझे काम नियमाने व करीत आलो आहेत मात्र काही लोकांच्या दुष्ट प्रवृत्ती मुळे मला नाहक मानसिक त्रासालासामोरे जावे लागत आहेत माझ्या कार्यालयातील लेटर पॅड सारखी खोटे लेटर तयार करून तसेच खोटे मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय रावेर या नावाने खोटा शिक्का तयार करून कोणीतरीमाझे नावाने प्रिन्सिपल सेक्रेटरी मुंबई यांच्याकडे माझे खोटी सही करून माझी बदली मेळघाट व गडचिरोली या सारख्या आदिवासी भागात व्हावी असे बनावट खोट्या स्वरूपाचे पत्र दिलेले आहे तसे मला लक्षात आले म्हणून मी पोलीस यांच्याकडे तक्रार करीत आहे मी पोलिसांना विनंती करतो की या कामी योग्य ती चौकशी करावी कारण सरकार सदरचे हा गंभीर प्रकार असुन बनावट लेटरहेड मेडिकल ऑफिसर च्या नावाने तयार केलेला बनावट व खोटा शिक्का हा सरकारी दस्तऐवज म्हणून तयार करणारा वापरू शकतो व त्यामुळे कार्यालयाचे तसेच सरकारचे अतोनात नुकसान होऊन गंभीर स्वरूपाचे नुकसान होईल सदर अनोळखी व्यक्तीने सदरचे लेटर पॅड शिक्का बनवून तयार केलेला आहे तसेच त्या बनावट पत्रावर टाकलेला जावक क्रमांक हा सुद्धा बनावट आहे अशा प्रकारचा जावक क्रमांक 184 / 21 हा आमच्या कार्यालयात नोंदणी नाहीच तसेच मी अशा स्वरूपाचे पत्र कधीही पाठवलेले नाही त्यामुळे आमचे जावक रजिस्टर पाहता 11- 6 -2019 रोजी पाठवलेले पत्र जावक क्रमांक हे या खोट्या पत्रा चे जावक क्रमांकाचे जुळत नाही त्यामुळे सदरचे पत्र हे बनावट व खोटे आहे अशा बनावट पत्रामुळे मला मनस्ताप होत आहे सदर कामी चौकशी होणे खूप गरजेचे आहे कारण बनावट कागदपत्रे तयार करून सदर व्यक्ती हा . काहीही त्याचा दुरुपयोग किंवा लाभ घेण्या ताही असु शकतो अश्या सदर हून रॅकेट ची योग्य प्रकारे चौकशी करून बनावट लेटरहेड व शिक्का तयार करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा अशी तक्रार येथील वैद्यकीय अधिकारी यांनी रावेर पोलीस स्टेशनला केलेले असून त्या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव आणि जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्या कडे पाठवली आहे
असाच काहीसा प्रकार दोन वर्षा पूर्वी येथे घडला असून दोन शिपाई याची अशाच पद्धतीने बदली अर्ज करून त्याची बदली करण्यात आली होती .
असा हा प्रकार करणारा कोण हा विषय चर्चेचा विषय ठरला असून अश्या ह्या थेट मंत्रालयाशी संबंध असलेल्या संबधीत व्यक्ती कोण यांचा शोध लावणे गरजेचे आहे रावेर पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे .मात्र ह्या घटनेचा तपास जलद होणे गरजेचे आहे.ह्या गंभीर प्रकरणाने जेणे करून कोणत्याही उत्तम अधिकार्यास त्रास होवु नये अश्या प्रकरणा मुळे रावेर सह जिल्ह्यातील आरोग्य विभागात तसेच प्रत्येक विभागात असे प्रकार येथेच आहे की मोठे रॅकेट आहे का? याबद्दल चौकशी होणे गरजेचे आहे