बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

गुहागर –

बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने दिनांक २५/०७/२०२१ रोजी बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर मुंबई या मातृतुल्य संस्थेच्या वतीने तसेच अंतर्गत संस्कार उपसमिती यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ अंकुर बुध्द विहार नायगाव दादर मुंबई येथे सायं.०५:३० वाजता करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे पहिले पुष्प आदरणीय संदिपजी गमरे साहेब (बौद्ध उपासक,बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर गाव वाकी अध्यक्ष संस्कार उपसमिती) हे होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर मुंबई या मातृतुल्य संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सिध्दार्थ पवार साहेब यांनी भुषविले.

कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय बौद्ध उपासक संदिपजी गमरे साहेब, मनोजजी पवार साहेब, कळंबे साहेब,सुविधाजी कदम तथा उपस्थित सन्माननीय मान्यवर यांच्या सुमधुर आवाजात बुध्द पुजापाठाने करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर मुंबई या मातृतुल्य संस्थेचे सन्माननीय उपकार्याध्यक्ष आदरणीय प्रभाकर पवार साहेब, बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर मुंबई अंतर्गत न्यायदान उपसमिती चे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शशिकांत मोहिते साहेब,बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर अंतर्गत शिक्षण उपसमिती चे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जतीन नागे साहेब, सन्माननीय विभाग अधिकारी विभाग क्रमांक ४ वेळंब आयु. अजय जाधव साहेब, सन्माननीय विभाग अधिकारी विभाग क्रमांक ७ कुंडली आयु. राजेंद्र जाधव साहेब, सन्माननीय विभाग चिटणीस विभाग क्रमांक ७ कुंडली आयु.सचिन गमरे साहेब, सन्माननीय श्रीमती सुविधाजी कदम सदस्या संस्कार उपसमिती,
सन्माननीय सौ.ज्योतीजी जाधव सदस्या विवाह उपसमिती, सन्माननीय बौद्ध उपासक मनोजजी पवार साहेब सदस्य संस्कार उपसमिती, सन्माननीय बौद्ध उपासक कळंबे साहेब सदस्य संस्कार उपसमिती, सन्माननीय आयु.संजयजी मोहिते साहेब सभासद कोतलुक शाखा क्रमांक ३७, तसेच कुमारी आकांक्षा अजय जाधव, कुमारी दिक्षा अनिल मोहिते, कुमार आदित्य अनिल मोहिते, कुमार आयुष अजय जाधव, हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर मुंबई या मातृतुल्य संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय संजयजी तांबे साहेब यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!