लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन यांनी वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली

पुणे प्रतिनिधी

26 जुलै

भारतीय सशस्त्र दलांनी 1999 मध्ये कारगिल येथे पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने आज कारगिल विजय दिवस साजरा केला. अतिउंच बर्फाळ प्रदेशात शौर्याने लढा देऊन शत्रूला नामोहरम करणार्‍या भारतीय जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दर वर्षी 26 जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुण्यातील राष्ट्रीय युध्द स्मारक येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात, दक्षिण कमांड चे जिओसी -इन-सी लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन यांनी देशाची प्रादेशिक अखंडता कायम राखण्यासाठी सर्वोच्च त्यागाचे आदर्श उभे करत कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पुणे येथील सर्वात ज्येष्ठ सेनानी, मेजर जनरल हुक्कुर ए.के. (निवृत्त) यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून कारगिल श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या दक्षिण कमांडमधील सर्व लष्करी ठाण्यांवर आठवडाभर अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले, यामध्ये विविध सोहोळ्यात, शौर्य पुरस्कार विजेते, सेनेतील माजी अधिकारी आणि वीर नारी यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी हे संरक्षण दलातील आपल्या सर्वांसाठी तसेच संपूर्ण देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत, त्यांचा सर्वोच्च त्याग आणि देशसेवा कधीच विसरता येणार नाही,ङ्ग असे उद्गार आर्मी कमांडर यांनी काढले. राष्ट्रीय युध्द स्मारक येथे उपस्थित असलेल्या सर्व निवृत्त सेनानींचा त्यांनी सन्मान केला. या सर्वांनी आखून दिलेल्या मार्गावरून भारतीय सेना मोठ्या ताकदीने योग्य दिशेने प्रगती करत आहे आणि भारतीय सैन्यदल देशासेवेप्रती संपूर्णत: कटिबद्ध आहे तसेच कोणत्याही संभाव्य घटनेला तोंड देण्यासाठी सुसज्ज आहे अशी खात्री त्यांनी या अनुभवी सेनानींना दिली.

हा कार्यक्रम, कोविड-अनुरूप नियमावलीचे कठोर पालन करून मर्यादित उपस्थितांसह साजरा करण्यात आला.

कारगिल विजय दिनानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद वीरांना आदरांजली वाहिली

महत्त्वाचे मुद्दे

संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना वाहिली आदरांजली

कृतज्ञ राष्ट्र नेहमीच या वीरांच्या साहसी कार्याच्या ॠणात राहील

संरक्षण राज्यमंत्री, सेना दलांचे आणि हवाई दलाचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि ण्घ्एण् यांनी देखील शहिदांना आदरांजली वाहिली

कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 26 जुलै 2021 ला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली. कारगिल संघर्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या 1999 मधील ऑॅपरेशन विजय मोहिमेदरम्यान भारताला विजय प्राप्त करून देताना देशसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या या शूरवीरांच्या सन्मानार्थ संरक्षणमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

राष्ट्रीय युद्ध स्मारकातील अभ्यागतांच्या नोंदवहीत लिहिलेल्या संदेशात राजनाथ सिंग यांनी कारगिल संघर्षात सहभागी झालेल्या साहसी वीरांच्या शौर्याचे स्मरण केले. भारतीय सेना दलांच्या धाडसी वीरांनी केलेल्या त्यागाला देश कधीच विसरणार नाही असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.

आपल्या टवीट संदेशात संरक्षणमंत्री म्हणतात की शूर सैनिकांनी केलेले सर्वोच्च त्याग येणार्‍या पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील.

शूर भारतीय सैनिकांच्या धाडसाला आणि समर्पणाला सलाम करतानाचा एक व्हिडिओ संदेश देखील त्यांनी टवीटर वरून सर्वांना बघण्यासाठी सामायिक केला आहे.

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट, हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे, संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांनी देखील या प्रसंगी राष्ट्रीय युध्द स्मारक येथे शहिदांना आदरांजली वाहिली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासनिक आणि लष्करी अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते.

कारगिल संघर्षादरम्यान भारतीय लष्कराच्या धाडसी जवानांनी, भारतीय हवाई दलाच्या मदतीने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, शत्रूच्या मुलुखात, असह्य हवामानाशी झुंज दिली आणि शत्रूने ताब्यात घेतलेल्या अतिउंचीवरील प्रदेश पुन्हा जिंकून घेतला. या अविस्मरणीय प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र विविध ठिकाणी शूर शहिदांचे स्मरण करत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या देशाचा विजय साजरा करीत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!