बेअरफुट फाऊंडेशन पुणे व शिवशंभू संघटना मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप…
पुणे- दि 15/7/2021 रोजी कै.सौ.कविता राजेश इंगोले पाटील यांच्या 7 व्या पुण्यस्मणा निमित्य मुखेड येथे बेअरफुट फाऊंडेशन पुणे व शिवशंभू संघटना मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात आले. हा उपक्रम दर सालप्रमाणे राबविण्यात येतो याही वर्षी रवि इंगोले पाटील यांच्या आईच्या प्रेरणेतून कार्यक्रम करण्यात येतो रवि इंगोले पाटील यांनी समाजकार्यची आवड आहे व मुखेड साठी गरजूंना मदतीचा आधार देण्याचे काम नेहमीच करत आसतात. खालील ओवी प्रमाणे आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही … घरटे माझे आईचे अन सोबतीला फक्त आठवण.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर साईनाथ इंगोले पा.(सामाजिक कार्यकर्ते) , श्रीनिवास पांचाळ, शिवानंद इंगोले पा बेळीकर(शिवशंभू संघटना मुखेड शहरअध्यक्ष),शिवानंद पांचाळ होकर्णाकर (शिवशंभू संघटना मुखेड सचिव), लहू बेदेवाड़, गंगाधर बोमनाळे(शिवशंभू संघटना होकर्णा शाखा अध्यक्ष), राजू पाड़ुणे, दिपक जुणे ,आजय सोनटके , इतर मान्यवर उपस्थित होते.