जरंडेश्वर बाबत आरोप फेटाळत अजितदादांनी त्या 65 कारखान्यांची नावे केली जाहीर, किरीट सोमय्यांनाही दिलं ’हे’ चॅलेंज
पुणे,
जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात होत असलेले आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य करत आरोप फेटाळून लावले आहेत. साखर कारखान्यांच्या संदर्भातील होणारे सर्व आरोप हे खोटे असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. आठ दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर आज अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखाना आणि त्या अनुषंगाने होणार्या सगळ्या आरोपांना सुमारे तासभर पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिली.
राज्यात गेल्या पंधरा वर्षांमध्ये जवळपास 65 साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने लिलावाद्वारे विक्री केली तर अकरा कारखाने हे भाडेतत्वावर चालवायला दिले असल्याचे सांगत केवळ अजित पवार यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या कारखान्यांवर बेछूट आरोप होत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी म्हटलं, साखर कारखान्याच्या संदर्भाने बरेच दिवस बातम्या येतात म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर काही सांगावं म्हणून मी बोलायचं ठरवलं. आता आरोप अती होत आहेत. साखर कारखान्याबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करुन काहीही निष्पन्न झालेलं नाही. साखर कारखान्याबाबत खोटी आकडेवारी सादर करुन आरोप केले जात आहेत. 25 हजार कोटींचा भ-ष्टाचार झाला, हा आरोप खोटा आहे.
अजित पवार म्हणाले, जरंडेश्वर 66 कोटी 77 लाखला गुरू कमोडिटी मुंबई यांनी विकत घेतला. नंतर ँ%उ च्या हनुमंत गायकवाड यांनी तो कारखाना चालवला त्यांना तोटा आला म्हणून त्यांनी दुसर्या कंपनीला विकला. जरंडेश्वरच नाव घेऊन माझ्या नातेवाईकांच्या नावाने टीका केली जाते.
जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री ही सर्वाधिक किमतीला झाली असूनही तीन आणि चार कोटी रुपयांत कारखाने विकले गेले, त्याबाबत कोणीच कधीच प्रश्न उपस्थित करत नाही. केवळ आपण महत्त्वाच्या पदावर असल्यामुळे काहीजण केवळ काही वकील आणि सीए कामाला लावून, दौरे करून आरोपांची राळ उठवत असल्याचा आरोप अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केला आहे.
जरंडेश्वर या सहकारी साखर कारखान्याची लिलावात विक्री झाल्यानंतर अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी हा कारखाना घेतल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच इकडे तक्रार करत जरंडेश्वर कारखान्याच्या संबंधित कंपनीत अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांचे समभाग असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. अजित पवार यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती जिरवली असून ते लवकरच तुरुंगात जातील असंही किरीट सोमय्या दोन दिवसापूर्वी ईडीला सगळी कागदपत्र सोपवून आल्यानंतर म्हणाले होते.
जरंडेश्वर कारखाना प्रकरणी 2010 पासून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले. न्यायालयीन समिती सुद्धा नेमण्यात आली सोबतच जरंडेश्वर कारखान्याचा संदर्भात पूर्वीच्या संचालक मंडळाने न्यायालयात अनेक याचिका केल्या मात्र या सगळ्या याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोघांनीही जरंडेश्वरच्या लिलावाला परवानगी दिली होती. सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली उद्देशाने अजूनही आरोप केले जातात आता केंद्रीय यंत्रणांनी पुर्ण तपास करावा संपूर्ण चौकशी करावी आणि सत्य काय आहे ते लोकांसमोर आणावा असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
किरीट सोमय्या यांच्या वरती बदनामीचा खटला दाखल करणे बाबत अजित पवार यांनी आपल्याला अनेक महत्त्वाचे काम असल्याचं सांगितलं त्यातच लहानपणी आपल्याला शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असा सल्ला वडीलधार्यांनी दिला होता अशी आठवणही त्यांनी केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेने 11 कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची टेंडर काढला आहे त्यापैकी एखादा कारखाना भाड्याने घेऊन ऊन बेछूट आरोप करणार्यांनी तो चालवून दाखवा… कारण कारखाना चालवणं हे येरागबाळ्याचे काम नाही हे त्यांना समजेल ,असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
राज्यातले सहकारी साखर कारखाने बंद पडण्याला त्या त्या कारखान्याचे ढिसाळ आणि घोटाळेबाज व्यवस्थापन कारणीभूत असून ज्यांच्या कारखान्याबद्दलची निष्ठा आणि व्यवस्थापन उत्तम आहे असे अनेक कारखाने महाराष्ट्रात आजही उत्तम सुरु आहेत अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भाजप सोबत दीड दिवसाच सरकार बनवून बाहेर पडल्यामुळे भाजप जाणीवपूर्वक कारवाई करतंय का? अस विचारल्यावर मात्र अजित पवार भडकले आणि त्यांनी मला जे करावं वाटल ते मी केलं मला तो अधिकार आहे. त्यामुळे असेल फालतू प्रश्न मला विचारू नका अस म्हणत त्यांनी भाजप सोबतच्या संबंधाच्या कटू आठवणीवर भाष्य करणं टाळलं.
जरंडेश्वरच्या अनुषंगाने अजित पवार यांच्यावर अनेक आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते. त्याच उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली खरी मात्र या कारखान्यांशी त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे की नाही याचा खुलासा काही शेवटपर्यंत केलाच नाही. केवळ लिलावाची प्रक्रिया योग्य होती असे सांगणारे न्यायालयाचे निकाल वगळता पैसे वळवल्याचा किंवा बेनामी संपत्तीच्या उल्लेखला अजित पवार बेईमान आहे की नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अस सांगून हा विषय लोकांसाठी मांडल्याच स्पष्ट केलंय.