पुण्यात बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे,

पिंपरी – चिंचवडमध्ये 45 वर्षीय बापाने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. बापाने पीडित मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारेल, अशी धमकीही आरोपी बापाने मुलीला दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई भांडी धुण्याचे काम करते. त्या दिवसभर घराच्या बाहेर असतात. दोन दिवसांपूर्वी मुलीवर बापाने बळजबरी करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने विरोध केला. याचा राग मनात धरून मुलीला बापाने मारहाण केली. आई कामावरून येताच शेजारील महिलेने मुलगी खूप रडत होती, तिचा मोठमोठ्याने आवाज येत होता, असे सांगितले. तेव्हा, मुलीला विचारणा केली असता सहा महिन्यांपूर्वी तू मोठी झाली आहेस का, असे म्हणून बळजबरीने बलात्कार केला होता, असे मुलीने आईला सांगितले, तर पुन्हा बळजबरी केल्याचेही सांगितले. या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी संगीत गोडे या करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!