महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येप्रकरणी बि-गेडियरवर गुन्हा दाखल

पुणे,

पुण्यात लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हिमाचल प्रदेश मधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या बि-गेडियरवर (सुपिरियर आर्मी ऑॅफिसर) गुन्हा दाखल केला आहे. अजित मिलू असं गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. 43 वर्षीय महिला अधिकार्‍याने आत्महत्या केली होती.

लष्कराच्या मिलिटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूल येथे महिला अधिकारी आल्या होत्या. त्यांची जयपूर येथे पोस्टिंग होती. त्यांचे पती देखील लष्करात अधिकारी आहेत. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्या आल्या होत्या. तीन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होत्या. निवासी खोलीत राहत असताना बुधवारी सकाळी त्यांनी खोलीतच गळफास घेतल्याचे आढळून आलं होतं. यामुळे खळबळ उडाली होती.

या प्रकरणी पूणे पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्याचा तपास सुरू होता. दरम्यान, बि-गेडियरवर अजित मिलू यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अजित हे हिमाचल प्रदेश येथे आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या हेडकॉर्टर येथे सुपिरियर आर्मी ऑॅफिसर (बि-गेडियर) या पदावर आहेत. त्यांनी महिला अधिकारी एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची धमकी देत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!