पुणे : सुमारे 16 किलो सोन्याची साडी परिधान केलेली महालक्ष्मी देवी

पुणे,

दसर्‍यानिमित्त सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग-वाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग-वाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग-वाल, विश्वस्त अ?ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग-वाल, तृप्ती अग-वाल, नारायण काबरा आदी मान्यवर उपस्थित होते.

10 वर्षापूर्वी साकारली सोन्याची साडी

राजकुमार अग-वाल म्हणाले, दक्षिण भारतातील कारागिरांनी 10 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे 11 वे वर्ष आहे. दसर्‍याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.

सामाजिक उपक्रमांचे आयोजन

अमिता अग-वाल म्हणाल्या, नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये झाले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कतृर्त्ववान महिलांचा सन्मान, लस देणार्‍या सेवकांचा गौरव, कोविड काळात पालकत्व हरपलेल्या व देवदासींच्या कन्यांचे पूजन, सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान, पोलीस खात्यातील महिलांचा गौरव असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते.

16 किलोची साडी

दसर्‍यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविक कोविडचे सर्व नियम पाळून दर्शनासाठी येत होते. महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट ुुु.ारहरश्ररुाळारपवर्ळीिीपश.ेीस यावरुन ऑनलाईन पूजा संकल्प तसेच फेसबुक पेज व युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग-वाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने नवरात्र उत्सवात दसर्‍यानिमित्त मंदिर प्रशासनातर्फे देवीला सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे. देवीचे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भक्तांची गर्दी पाहण्यास मिळाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!