मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह 40 ठिकाणी आयकर विभागाचे छापे
पुणे
आयकर विभागाकडून एक मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात एकूण 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे. पुण्यातील एका मोठ्या उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडून पुण्यातील उद्योजकाच्या संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्रातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातील ज्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे त्या व्यावसायिकाचा काँग-ेस आणि राष्ट्रवादी काँग-ेस यांच्यासोबत जवळचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या महिन्यात 25 ऑॅगस्ट 2021 रोजी आयकर विभागाने महाराष्ट्र आणि गोव्यात विविध ठिकाणी छापेमारी केली होती. एकूण 44 हून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली होती. ज्या समुहावर ही कारवाई करण्यात आली होती तो समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोव्यातील एका नामांकित पोलाद उत्पादक आणि व्यापारी आहे. आयकर विभाकाने ही छापेमारी करुन अनेक महत्त्वाचे कागपत्रे, डिजिटल पुलावे जप्त केले होते.
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांनतंर समोर आलेल्या पुराव्यामुळे हे उघड झाले की, हा समूह विविध बनावट पावत्या तयार करणार्यांकडून भंगाराची आणि स्पंज आर्यनची खरेदी करण्याच्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतला होता. या कारवाई दरम्यान बनावट पावत्या जारी करणार्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. अशा पावत्या देणार्यांनी कबूल केले आहे की, त्यांनी केवळ देयके पुरवली मात्र ज्याची देयके होती ते साहित्य पुरवलेले नाही.
खरोखर खरेदी केल्याचे दाखविण्यासाठी आणि जीएसटी इनपुट क्रेडीटचा दावा करण्यासाठी बनावट ई-वे देयके देखील निर्माण करण्यात आली. पुण्याच्या जीएसटी प्राधिकरणाच्या सक्रीय पाठिंब्याने, बनावट ई-वे देयके ओळखण्यासाठी ‘व्हीईकल मुव्हमेंट ट्रॅकिंग अॅप‘ चा वार करण्यात आला होता. या समूहाने एकूण बनावट खरेदी, आतापर्यंत सुमारे 160 कोटी रुपयांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयकर विभागाने केलेल्या कारवाईत विविध ठिकाणांवरून 3 कोटी रुपयांची हेहिशेबी रोकड आणि 5.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले होते. यासोबतच 1.34 कोटी रुपयांचे 194 किलो चांदीच्या बेहिशेबी वस्तू सुद्धा या कारवाई दरम्यान सापडल्या होत्या.