रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे

सिंहगड पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांनी राष्ट्रवादी काँग-ेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याची टिका केली होती. दरम्यान या विरोधात आता तक्रार दाखल झाल्यामुळे दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. ही तक्रार राष्ट्रवादी काँग-ेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दाखल केली आहे. प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी होती. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात एफआयआर दखल केल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या महाराष्ट्रातील एकतेला आणि परंपरेला नख लावायचे काम गेल्या दोन वर्षापासून भाजप करत आहे. महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल, याकडे सातत्याने त्यांचे जास्त लक्ष आहे. भाजपने वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खालची राजकारणाची पातळी गाठली आहे. प्रवीण दरेकर यांनी अतिशय अलि असे विधान केलं. जाहीर सभेत बोलत असतांना महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे. दरेकर यांनी यावर माफी मागने अपेक्षित होते. पण या गोष्टीला मी ऐवढे महत्व देत नसल्याचे दरेकर म्हणाले होते. त्यामुळे या प्रकरणी मी तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!