पुणे महापालिका प्रभाग रचना जाहीर; सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे

पुणे,

मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे करण्यास सुरुवात झाली आहे. तीनचा प्रभाग रचना महाविकास आघाडी सरकारसाठी अनुकूल असून, येणार्‍या निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ, असा दावा महाविकास आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. तर प्रभाग कितीचाही असला तरी पुणेकर आमच्यावर विश्वास दाखवतील आणि पुन्हा आमचेच सरकार येईल, असा विश्वास भाजप व्यक्त करत आहे.

पुढील वर्षी राज्यातील महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आज मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आतापासूनच राजकारण तापू लागले आहे.

मागच्या निवडणुकीला चारचा एक प्रभाग होता. राज्यात सरकार बदलल्यानंतर या सरकारने एकचा प्रभाग केला आणि आता तो तीनचा केला आहे. चारच्या प्रभागात भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आले. या पाच वर्षात आम्ही महापालिकेत चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. प्रभाग कितीचाही असला तरी पुणेकर आमच्यावर विश्वास दाखवतील आणि पुन्हा आमचेच सरकार येईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये 3 सदस्य प्रभाग पद्धतीला अनुकूलता देण्यात आली आहे. 3 सदस्य प्रभागला मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयाचे मी अभिनंदन करतो. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहे. प्रभाग एक किंवा दोन किंवा 4 बाबत चर्चा करत असताना प्रभाग कितीचाही असो तुमची निवडूण येण्याची ताकद असली पाहिजे, असे दादा नेहमी सांगत असतात. जो काही अपप्रचार सुरु आहे तो चुकीचा असून अजित पवार यांनी देखील अनुमती दर्शविली आहे. म्हणूनच तीनचा हा प्रभाग झाला आहे. प्रभाग कितीचाही झाला तरी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग-ेसचा महापौर करण्याची आमची तयारी झाली आहे. पुणेकर आमच्या बरोबर असून, या पाच वर्षात भाजपचा भोंगळ कारभार पाहिला आहे. आज मंत्रिमंडळात झालेला निर्णय हा राष्ट्रवादी काँग-ेसला अनुकूल आहे, असं मत राष्ट्रवादी काँग-ेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. खरं तर हा निर्णय करायला राज्य सरकारने उशीरच केला आहे. परंतु तीनही पक्षात कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुणे महापालिकेत प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपच्याच बाजूने राहणार असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे. पुणेकरांनी पाच वर्षांपूर्वी टाकलेला विश्वास महापालिकेतील विकासकामांतून भाजपने सार्थ ठरविला आहे. मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, पुणे विकास आराखडा, मोठ्या प्रमाणात पीएमपीएमएल बसेसची खरेदी, उद्यानांची निर्मिती, सक्षम आरोग्य यंत्रणा, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती आदी इतकी वर्षे कागदावर असणारे प्रकल्प भाजपच्या कारकिर्दीत मार्गी लागले आहेत.

कोविडच्या काळात महापालिका प्रशासन आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. याउलट राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पुणेकरांचा भ-मनिरास केला आहे. पुण्यासाठी कोणतीही ठोस योजना सरकारला करता आलेली नाही. पुणे शहराला आजपर्यंत शून्य निधी उपलब्ध करून दिला. भाजपचे बुथप्रमुख, बूथसमिती, शक्तीकेंद्र प्रमुख आदी संघटनात्मक रचना पूर्ण झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घरोघरी संपर्क सुरू आहे. महापालिकेतील उत्तम काम, संघटनात्मक बांधणी, पुणेकरांचा विश्वास आणि राज्य सरकारचे अपयश यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे, असं मत भाजप प्शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!