येणार्या निवडणुकीत नव्या चेहेर्यांना संधी, जुन्यांचा समन्वय – अजित पवार
पुणे,
’लवकरच जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जसं मागच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही तुमच्या भागातून खासदार देखील निवडून देण्याचा काम केले आहे. तसेच जिल्ह्यातून 10 आमदार राष्ट्रवादी काँग-ेसचे आणि 2 आमदार काँग-ेसचे निवडून दिले. आम्ही खासदार-आमदार मंत्री झालो, तरी खाली काम करणार्या कार्यकर्त्याला देखील संधी मिळाली पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच येणार्या जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या निवडणुकीत नव्या चेहेर्यांचा आणि जुन्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे’, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
मांजरी बुद्रुक येथे अजित दत्तात्रय घुले, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग-ेस यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
’आपण सर्वजण अतिशय उत्सहात काम करा. पक्षाला कोठेही कमीपणा येणार नाही, असं काम करू नका. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करणं खूप महत्त्वाचं असतं. सगळ्याचच काम होईल, असं होत नाही’, अशीही सूचना यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.