पतीच्या मृत्यूनंतर विरहाने व्याकुळ पत्नीचीही आत्महत्या, इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मारली ऊडी

ठाणे

पतीच्या मृत्यूनंतर विरहाने व्याकूळ झालेल्या एका महिलेने इमारतीच्या 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. शहरातील हिरानंदानी परिसरात गुरुवारी (9 सप्टेंबर) ही धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर 11 वाजताच्या सुमारास पत्नीनेही इमरातीवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आलेली आहे. यु. के गीता असे आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव आहे.

गीता या हिरानंदानी परिसरात ए-1 इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहतात. त्यांचे पती पुरूषोत्तम नांबियार हे लिव्हर कँसरने पीडित होते. गुरवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गीता या अस्वस्थ झाल्या होत्या. पतीच्या मृत्यूच्या घटनेने दुखी आणि विरहाने त्या खुपच व्याकुळ झाल्या होत्या. त्यानंतर सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन पतीच्या मागे स्वत:ची जीवन यात्राही संपविली.

रानंदानी येथे पती, पत्नी राहत होते. तर मुलगा हा बाजूच्या इमारतीत राहत होता. गीता यांना कुठलीही अडचण नव्हती, कुठलेही टेन्शन नव्हते, तरीही गीता यांनी आत्महत्या ही केवळ पतीच्या विरहाने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आलेली आहे, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!