पुणे पालिका भाजप आमदारावर मेहरबान, कंपनीला दिले 41 कोटींचे कंत्राट!
पुणे,
पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या नावाखाली ठेकेदार पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या ’क्रिस्टल इंटिग-ेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.’ यांना 41 कोटी रूपयांना देण्यास स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली असून सर्वांत कमी रक्कमेची निविदा आलेल्या ठेकेदाराला परवाण्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे अपात्र ठरवून ’प्रसाद’ घेऊन भाजप आमदाराला हे काम देण्याचे ’लाड’ स्थायी समितीने केले असल्याची टीका महापालिका वर्तुळात करण्यात येत आहे.
महापालिकेची विविध आस्थापना, इमारती व उद्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात येतात. यासाठी गेल्या काही वर्षांपासून निविदा पद्धतीने सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम देण्यात येते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी ही निविदा संपुष्टात आल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महापालिकेत 1580 सुरक्षारक्षक ठेकेदारी पद्धतीने नेमण्यात येणार आहेत. यासाठी ही निविदा 41 कोटींची आली. यासाठी प्रसाद लाड यांच्याशी निगडित असलेल्या ’क्रिस्टल इंटिग-ेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीच्या निविदेला स्थायी समितीमध्ये एकमताने मान्यात्या देण्यात आली.मात्र भारतीय जनता पक्षाने पुणेकरांचे हाल करू नये व टेंडरमध्ये भाजपचे नेतेमंडळी हस्तक्षेप करत असल्याचे आरोप पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे.
महापालिकेत सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी गृह खात्याची परवानगी आवश्यक असते. बहुउद्देशीय कामगार पुरविण्यासाठी ही परवानगी आवश्यक नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निविदा मागवीत असताना ’सुरक्षारक्षक पुरविणे अशी निविदा न मागविता, बहुउद्देशीय कामगार पुरविणे अशी निविदा मागवली आहे.
मात्र, निविदा बदल करण्यासाठी भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवक यांचे दबावतंत्र वापरून प्रशासनावर दबाब आणला जात आहे. जर निविदा प्रक्रियेत अशा प्रकारचा हस्तक्षेप योग्य नसून उइख, अउइ यांच्याकडे रीतसर तक्रार करणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलंय.
स्थायी समितीमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या निविदेला विरोध केला नसल्याची टीका भाजपकडून केली जातेय जर खरंच असं काही असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं, खुद्द पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसंच, कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत ती काही गडबड असेल तर ते होऊ दिला जाणार नाही. असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
महानगर पालिकेच्या निविदा बदल प्रक्रिया ही राष्ट्रवादी काँग-ेसच्या काळातही करण्यात आल्या होत्या. अटी व शर्ती बदलण्याचा आरोप चुकीचा असून तांत्रिक दृष्ट्या सगळी प्रक्रिया योग्य रीतीने पूर्ण केले असल्याचा दावा बीडकर यांनी केलाय तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांनी व्यवसाय करू नये का? असा सवाल सभागृह नेते बीडकर यांनी उपस्थित केला आहे.तसंच राष्ट्रवादी काँग-ेसच्या नेत्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
पुणे महानगरपालिकेतील निविदा प्रक्रियेत प्रसाद लाड यांना कंत्राट मिळेल याची पुरेपूर खबरदारी सत्ताधारी भाजप ने घेतली खरी मात्र विरोधकांची पुढची भूमिका काय असणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.