पुण्यातील कोथरूड डेपो परिसरात असलेल्या मेट्रो कारशेड भागात फायरिंग, एक कामगार जखमी

पुणे,

पुण्यातील कोथरूड डेपो परिसरात असलेल्या मेट्रो कारशेड भागात फायरिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात एका कर्मचार्‍याला गोळी लागल्याने किरकोळ जखमी झाला आहे. तर या ठिकाणी काही काडतुसे देखील सापडली आहेत. कोथरुड परिसरात असलेल्या मेट्रोच्या कारशेडमध्ये काम सुरू आहे. अनेक कामगार त्याठिकाणी काम करत असतात. काम सुरू असताना सुमारास अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. तर एक गोळी येथील कर्मचार्‍याच्या पायाला चाटून गेली. यामध्ये हा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

या ठिकाणी फायरिंग कुणी केली, बंदुकीच्या गोळ्या नेमक्या कुठून आल्या याचा तपास पुणे पोलीस करीत आहेत. या कारशेडच्या काही अंतरावरच लष्कराचं ट्रेनिंग सेंटर सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि त्याच भागातून फायरिंग झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय. या ठिकाणी सापडलेल्या गोळ्या नेमक्या कुठल्या आहेत, कुणी फायर केल्या, कुठल्या बंदुकीतुन फायर केल्या त्याचा तपास पुणे पोलिस करत आहे.

लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट कोथरूड कचरा डेपो येथील मेट्रो कार शेडवर जाऊन लागल्या. या गोळ्या शेडमधून आत आल्या. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी घडली. पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आहे.

गोळीबाराबद्दल अद्याप काहीच माहिती नाही

मेट्रोच्या सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडच्या जुन्या कचरा डेपोवर मेट्रोचे कार शेड आहे. याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या पलीकडील बाजूस लष्कराच्या जवानांचे प्रशिक्षण सुरू होते. दुपारी मेट्रो शेडमध्ये काम करीत असताना पत्र्यावर अचानक गोळ्यांचा आवाज झाला. यातील काही गोळ्या पत्र्याला छेदून आतमध्ये आल्या. यातील एक गोळी कर्मचार्‍याला लागली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, ही गोळी एके 47 किंवा तत्सम रायफलची असावी असा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. लष्कराकडुन या घटनेबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. तसेच मेट्रोचे अधिकारीही याविषयावर बोलणे टाळत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!