चुकीच्या पद्धतीने काम करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, नितीन गडकरी यांच्या अधिकार्‍यांना सुचना

पुणे,

राज्यात जे ठेकेदार चुकीच्या पध्दतीने रस्त्याची कामे करुन नागरिकांना वेठीस धरतात अशा ठेकेदारांना तातडीने काळया यादीत टाकण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते-वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि प्राधिकरणाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

चुकीच काम करणार्‍या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातून सुरु होणार्‍या दोन्ही पालखी मार्गाचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच, पुण्यात जी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने रस्त्याची कामे सुरु आहेत त्यासीठी जिल्हाधिकारी यांना तातडीने आवश्यक असणार्‍या जागा प्राधिकरणाकडे सुपुर्द करण्याचे निर्दैर्श दिले आहेत. तसेच, काही ठेकेदार चुकीच्या पध्दतीने रस्त्याची आखणी करत असतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. अशा ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे आदेशही गडकरी यांनी यावेळी दिले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!