जेष्ठ पत्रकार प्रा.दिनेश रोडे पाटील यांचे दु:खद निधन
पुणे,
पुणेवाकड- शिव,फुले,शाहु आंबेडकर चळवळीचे ख्यातनाम जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनेकांचे स्नेहीमित्र ,हजारो विध्यार्थ्यांनचे शिक्षक-कलाध्यापक प्राचार्य सच्चे रयत सेवक ,साहित्यिक, कवी,चित्रकार पत्रकार प्रा.रा.ना.तथा दिनेश रोडेपाटील मूळचे जवळा ,जामखेड -कर्जत सध्या वास्तव्य पुणे वाकड येथे नुकतेच 14 आंगस्ट 2021 रोजी वयाचे 67 व्या वर्षी निधन झाले पण मुलगा अमेरिकेवरून येणार असल्याने त्यांचे अत्यंविधी 16 आगस्ट 2021 रोजी वाकड ,अमरधाम येथे सकाळी 11।30 करण्यात आले. त्यांचे मागे पत्नी, 2 मुले ,1 मुलगी ,सुना ,जावई, नातवंडे आणि 2 भाऊ असा परिवार आहे.
याप्रसंगी अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की नुकतेच कवी डॉ. प्रल्हाद वडगांवकर यांच्या महात्मा फुले गीत चरित्र पुस्तकांसाठी प्रसंगानुरूप महात्मा फुले यांच्या जीवनातील चित्रे काढण्यास सांगितले असता त्यांनी आप्ताचे काम व फुले दांपत्यावरील श्रद्धेपोटी त्यांनी कसल्याही मानधनाची अपेक्षा न बाळगता सोशीकतेने सत्यशोधक महात्मा फुले यांचे जीवनातील प्रसंगानुरूप विविध वास्तवाला अनुसरून वाचकांच्या मनाला भावतील अशी पुस्तकाच्या अंतरंगातील रेखाचित्रे अत्यंत अल्पावधीत शरीरावर विविध शस्त्रक्रिया जखमा ताज्या असताना व वैधकीय उपचार सुरू असताना काढून दिली .या पुस्तकाचे नुकतेच दि.11 एप्रिल 2021 रोजी ऑनलाईन प्रकाशन केल्याने मला त्यांचा कोव्हिडं मुळे जाहीर कार्यक्रम करून सन्मान करता आला नाही याचा खेद वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी सबंध होता तसाच गावच्या शाळा ,महाविद्यालय तसेच गावच्या विकास कामासाठी नेहमी धडपड करणारे व्यक्तीमत्व होते त्यांनी ङराष्ट्र सह्याद्री दैनिकातुन ज्वलंत प्रश्नावर अनेकवेळा व्यंगचित्र रेखाटून त्या गोष्टीवर विचार करण्यास भाग पाडलेले होते. त्यांचे 2 काव्यसंग्रह आगटी आणि कुणब्याची जिनगाणीङ प्रकाशित झाले आहे. अनेक पेपर मधून नेहमी विविध विषयांवर लेख लिहीत. त्यांचा पत्रकारितेचा पण दांडगा अभ्यास असल्याने त्यांनी तरुण पिढीला पत्रकारिता कशी करावी या विषयी मार्गदर्शन करीत.वयाने जेष्ठ असले तरी लहान मुलापासून ते जेष्टमंडळी सोबत तेवढीच मैत्रीपूर्ण रहात होते. त्यांचे जाण्याने पुणे वाकड ,व कर्जत परिसरातील एक मोठी नामवन्त व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.