पुण्यात राष्ट्रवादीकडून विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा; विजेत्याला मिळणार ‘हे’ बक्षीस
पुणे
पुणे शहर हे नेहमीच शहरातील फ्लेक्सबाजी तर कधी अनोख्या पद्धतीचे आंदोलनामुळे चर्चेत असते. पण आता राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाकडून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास बक्षीस देखील दिली जाणार आहेत.
2017 पर्यंत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग-ेसची सत्ता होती. पण 2017 च्या निवडणुकीत पुणेकरांनी सत्ता भाजपच्या हाती दिली. पण मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही योजना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यात अपयश आल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही, दांडेकर पूल येथे कालवा फुटीची घटना, शहरात अनेक भागात खड्डे, यासारख्या समस्या असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांसारख्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत समस्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. यासह अनेक प्रश्नावर अनेक वेळा सभागृहात किंवा बाहेर राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे. आता तर राष्ट्रवादी काँग-ेसकडून विकासाची पोलखोल स्पर्धा जाहीर केली आहे. संबधित व्यक्तीने आपल्या परिसरातील समस्या व्हिडिओ किंवा फोटो क्ष्ज्दत्ज्ञप्दत्ज्ल्हा या हॅशटॅगवर पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणार्या व्हिडिओ आणि सेल्फी फोटोला प्रत्येकी 11,111 रुपये, असे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. आता पुणेकर या स्पर्धेला कसा प्रतिसाद देतात, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.