बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी; कोकण राज्यात अव्वल

पुणे प्रतिनिधी

3 ऑगस्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाही परीक्षा रद्द करण्यात आली होती. यंदा बारावीचा निकाल हा 99.63 टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल हा 99.45 टक्के, तर कला शाखेचा 99.83 टक्के आणि वाणिज्य शाखेचा 99.91 टक्के तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 98.80 टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 99.81 टक्के इतका लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 99.34 टक्के इतका निकाल लागल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

निकालाची ठळक वैशिष्टयेया परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल शाखांतील एकूण 13,19,754 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13,19,754 विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 13,14,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.63 टक्के इतकी आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 66,871 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66,867 विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 63,063 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.31 टक्के इतकी आहे.

कोकण विभाग अव्वल

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (99.81म) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (99.34म) आहे.

नेहमीप्रमाणे मुलींची बाजी

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.73 म असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.54 म आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.99 म ने जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59म लागला आहे.

70 विषयांचा निकाल 100 टक्के

एकूण 160 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशानुसार गुणदान करण्यात आलेले असून त्यामध्ये 70 विषयांचा निकाल 100 म लागला आहे.

4789 विद्यार्थी नापास

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या 10 वी आणि 11 वीच्या गुणांच्या आधारे 12 वीचा निकाल लावण्यात आला आहे. तरीही या वर्षीच्या निकालात 4 हजार 789 विद्यार्थी हे नापास झाले आहेत.

46 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात 35 टक्के मिळालेले 12 विद्यार्थी असून 90 टक्के मिळालेले विद्यार्थी 91 हजार 425 आणि 85 टक्क्यांपेक्षा जास्त मिळालेले विद्यार्थी हे 1372 आहे. विशेष म्हणजे 46 विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.

सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 99.81 सर्वात कमी निकाल औरंगाबाद 99.34

आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा 99.81 टक्के लागला असून सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा 99.34 टक्के लागला आहे.यात पुणे विभागाचा 99.75 टक्के,नागपूर विभागाचा 99.62 टक्के

विभागनिहाय निकाल

औरंगाबाद विभागाचा 99.34 टक्के

मुबंई विभागाचा 99.79 टक्के

कोल्हापूर विभागाचा 99.67 टक्के

अमरावती विभागाचा 99.37 टक्के

नाशिक विभागाचा 99.61 टक्के

लातूर विभागाचा 99.65 टक्के

कोकण विभागाचा 99.81 टक्के लागला आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!