श्री दत्त विद्या मंदिर शाळेत वैद्यकीय तपासणी
पातोंडा ता.अमळनेर – येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यी व विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी केली. या प्रसंगी औषधशास्त्र अधिकारी गिरीष शिंदे, आरोग्य सेविका पुनम नारे, मुख्याध्यापक प्रदिप शिंगाणे, पर्यवेक्षक व्हि सी पाटील , आरोग्यदुत अमित पवार , उपशिक्षक शरद सोनवणे , भुषण बिरारी , शिपाई अनिल बिरारी व अतुल पवार आदी उपस्थित होते.