शुल्लक कारणावरून मारहाण – तिघांवर गुन्हा
पारोळा प्रतिनिधी –
शुल्लक कारणावरून दोन जणांना मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील चिखलोड येथे गेल्या बारा रोजी प्रविण पाटील यांनी विश्वनाथ दशरथ पाटील यांना कोणी माझे शेतातून ट्रॅक्टर आणल्याचे विचारत असताना यावेळी गावातील दत्तात्रय भटा पाटील,गजानन भटा पाटील,भटा दशरथ पाटील अशांनी त्यांना मारहाण,शिवीगाळ केली.यावेळी भांडण सोडविण्यास किशोर पाटील हे आले असता त्यांना ही मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून आज पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.