दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटीबद्ध – यू. एच. करोडपती
(पारोळा येथे बालाजी विद्यालयात पालक मेळावा)
पारोळा प्रतिनिधी –
आपल्या पाल्यास योग्य संस्कार देऊन सुजाण नागरिक घडवा.विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटीबद्ध आहे असे संस्थाध्यक्ष यू एच करोडपती यांनी मार्गदर्शनात सांगितले.
येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात आयोजीत पालक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, राधिका बडगुजर पालक प्रतिनिधी म्हणून सुनील पाटील, नवल बडकस,ज्ञानेश्वर पाटील, संतोष चौधरी,ईश्वर चौधरी,संजय पाटील,दिनेश हजारे,एलचंद पाटील,भैय्यासाहेब रोकडे,धीरज महाजन,विकास चौधरी,प्रसाद वाणी,जितेंद्र वानखेडे,प्रविण बडगुजर आदी उपस्थित होते.
यावेळी पालक-शिक्षकांत विविध समस्या व विषयांवर चर्चा झाली.मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्था विविध उपक्रम राबवीते, त्यांचा गुणवत्तेसाठी संस्था सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.डॉ.सचिन बडगुजर यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पालक- शिक्षक संघाची स्थापना करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन,ई- लर्निंग आदी विषयांबाबत चर्चा केली.शिक्षक सूर्यकांत चव्हाण यांनी पालकांसाठी विविध सूचनांचे वाचन करून सविस्तर माहिती दिली.सूत्रसंचालन धनेश पाठक यांनी केले तर आभार अश्विनी पिले यांनी मानले.