शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पारोळा येथे रास्ता रोको आंदोलन….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे रविवारी शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात शिवतीर्थ येथे शिवरायांच्या स्मारकास माल्यार्पण करून मोर्चेला सुरूवात झाली.मोर्चा मुख्य बाजार पेठेतून नगरपालिका,पीर दरवाजा,कजगाव नाक्यावर येऊन आंदोलनास सुरूवात करणारच यावेळी,कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये, यासाठी आपल्या मागण्या शासन स्तरावर पुर्ण करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन देण्यात आले,शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली,शासनाच्या वतीने त्यांनी मागण्या स्वीकारून कार्यवाहीसाठी पुढे पाठवीतो असे सांगितले.आंदोलनाला तालुक्यातील विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला.घोषणा,झेंडे व मागणी फलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन शांततेत पार पडून त्यात जिल्हा सचिव आनंदराव पाटील,पारोळा तालुकाध्यक्ष डॉ.विनोद चौधरी, तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर,धरणगाव तालुकाध्यक्ष संजय चव्हाण,तालुका कार्याध्यक्ष प्रदिप चव्हाण व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या:
कापसाला १३ हजार पर्यन्त हमीभाव मिळावा,सबसिडी अदा करावी,हमी भावात दरवर्षी १५% वाढ करण्यात यावी,तेलंगाना सरकार ‘रयतु बंधू’ योजनेर्तगत शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते घेण्यासाठी,प्रती एकर प्रती वर्ष १० रुपये देते तसेच महाराष्ट्र सरकारने कमीत कमी २० हजार रुपये द्यावे,शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाना २४ तास वीज द्यावी,पिक विमा नुकसान भरपाई हि अत्यल्प मिळाली असून ती सरसकट प्रती हेक्टर ३८ हजार अशी द्यावी.