आयटीआयच्या परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी….

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण पारोळा संस्थेद्वारे सन २०२०-२१ मधील घेण्यात येणारी कोपा, फिटर,वेल्डर,इलेक्ट्रिशियन,एम एमवी परीक्षा ही सन २०२१-२२ मध्ये घेण्यात यावी यासंदर्भातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आज दि.२२ रोजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,तहसीलदार अनिल गवांदे आणि शासकीय आयटीआयचे चार्ज विनोद पवार यांना निवेदन दिले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ८८ परीक्षार्थी विद्यार्थ्याची सन २०२०/२१ मध्ये होणारी अंतीम वर्षाची परिक्षा ऐन वेळी नियोजित केंद्र ( एसएसपीएम आयटीआय टेहू, कजगाव रोड,पारोळा ) येथे होणार होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही परिक्षा रद्द झाली होती अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली तसेच यात वेल्डर ३० ,कोपा २३ , इलेक्ट्रिशियन ०८ , फिटर १८,एमएमवी ०९ असे एकुण ८८ विद्यार्थी आहेत.सदर परीक्षा ही अद्यापावेतो घेण्यात आली नसल्याने याविषयी संस्था प्राचार्य अजीमजी शहा यांना विद्यार्थ्यांनी वारंवार विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तरे देण्यात आली तसेच परिक्षा न झाल्याने सर्व विद्यार्थी संभ्रमात असुन शैक्षणिक नुकसान होत असल्याची विद्यार्थ्यांनी वारंवार तोंडी विनंती देखील केली परंतु संबंधित प्राचार्य शहा यांनी विद्यार्थ्यांना वरती पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.म्हणून पातळीवरुन योग्य ती कार्यवाही करुन एका महिन्याच्या आत परिक्षा होतील असे नियोजन करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अन्यथा परिक्षा न झाल्यास सर्व विद्यार्थी हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारोळा येथे सामुहीक आत्मदहन करतील असा इशाऱ्याचे निवेदन आमदार चिमणराव पाटील,तहसीलदार अनिल गवांदे ,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि संस्थेचे चार्ज विनोद पवार यांना दिले आहे.

विद्यार्थ्यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना परीक्षा घ्यावी या संदर्भात निवेदन दिले असता पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी प्रिन्सिपल अजिमजी शहा आणि नाशिक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जॉईंट डायरेक्टर प्रफुल्ल वाकडे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी द्विधा मनस्थितीत असून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी अशी विनंती केली

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!